भाजपची विधानसभा निवडणुकीत स्थिती काय ?

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला.

भाजपची विधानसभा निवडणुकीत स्थिती काय ?
Five States Assembly Election

 भाजपची विधानसभा निवडणुकीत स्थिती काय ?

What is the position of BJP in Assembly elections ?

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल  काल जाहीर झाला. 

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल  काल जाहीर झाला. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या  तृणमूल काँग्रेसने विजयाची हॅट्ट्रिक केली.

आसाममध्ये  भाजपला सत्ता राखण्यात यश आलं. केरळमध्ये  LDF ने सत्ता राखली, तर तामिळनाडूत  एआयडीएमकेची सत्ता पालटली असून द्रमुकने मोठा विजय मिळवला. तर पुद्दुचेरीमध्ये  भाजपप्रणित एनडीएने काँग्रेसला धोबीपछाड दिली. 

पुद्दुचेरी विधानसभेच्या सर्व 30 जागांसाठी विधानसभा निवडणूक 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. 10.04 लाख मतदारांपैकी जवळपास 82 टक्के जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

अखिल भारतीय एनआर कॉंग्रेस  आणि भाजप मिळून पुद्दुचेरीमध्ये पुढील सरकार स्थापन करणार आहेत. भाजप प्रणित NDA ने 16 जागा जिंकत 30 सदस्यीय विधानसभेतील बहुमताचा जादूई आकडा पार केला. एआयएनआरसीने एकूण 16 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते, तर भाजपने नऊ जागांवर निवडणूक लढवली होती.

केरळ विधानसभा निवडणुकीत लेफ्टिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने ऐतिहासिक विजय मिळवला. माकपच्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीने 99 जागा जिंकून सत्ता कायम राखली. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला  41 जागांवर समाधान मानावे लागले.

140 सदस्यीय केरळ विधानसभेत भारतीय जनता पार्टी  च्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकही जागा मिळवू शकली नाही. 2016 मध्ये तिरुअनंतपुरममधील नेमोम मतदारसंघाची जिंकलेली एक जागा टिकवून ठेवण्यासही त्यांना अपयश आलं.

डाव्या लोकशाही आघाडीमध्ये माकपने अपक्ष उमेदवारांसह 68 जागा जिंकल्या. त्यांचे सर्वात जवळचे सहयोगी भाकपने 17 जागा जिंकल्या, तर डाव्यांत नव्याने सहभागी झालेल्या केरळ काँग्रेसने लढवलेल्या 12 पैकी 5 जागा जिंकल्या.

जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस  यांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या. तर लोकतांत्रिक जनता दलाने लढलेल्या तीन जागांपैकी फक्त एक जागा जिंकली. केरळ काँग्रेसने आपली जागा राखून ठेवली, तर इंडियन नॅशनल लीग आणि काँग्रेस  यांनी एक जागा जिंकली.

मुख्य विरोधी काँग्रेसला लढलेल्या 91 जागांपैकी केवळ 21 जागा जिंकता आल्या. यूडीएफचे भागीदार इंडियन युनियन मुस्लिम लीगने  देखील निवडणूक लढवलेल्या 27 जागांपैकी 15 जागा जिंकून निराशा केली. केरळ काँग्रेसने दोन जागा जिंकल्या, तर केरळ काँग्रेस , राष्ट्रीय सेक्युलर परिषद आणि भारतीय क्रांतिकारक मार्क्सवादी पार्टी  यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.

पिनरयी विजयन यांच्या नेतृत्वासमोर काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही मुख्य विरोधक निष्प्रभ ठरले. भाजपमधील दोन जागांवर निवडणूक लढवणारे वरिष्ठ नेते कुम्मनम राजशेखरन, प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन, तसेच सोभा सुरेंद्रन आणि मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आसाम विधानसभा निवडणुकीत सहज बहुमत मिळवले. एकूण 126 मतदारसंघांपैकी 75 जागा जिंकून राज्यात सरकार स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपाने एकूण 60 जागा मिळवल्या, एकूण मतांच्या जवळपास 33.2 टक्के मतं त्यांना मिळाली, तर मित्रपक्ष असम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल (यूपीपीएल) यांनी अनुक्रमे नऊ आणि सहा जागा जिंकल्या.

काँग्रेसला 29 जागा  मिळवण्यात यश आले, तर महाजोथचे मित्रपक्ष एआययूडीएफने 16 आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटने चार जागा जिंकल्या. भाकपने एक जागा मिळवली. रविवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी सोमवारी पहाटे 5:40 वाजता संपली.

पुढच्या मुख्यमंत्र्यांविषयीचा निर्णय भाजपच्या संसदीय मंडळाकडून घेणार असल्याचे सरमा म्हणाले. तुरुंगवासी अखिल गोगोई यांनीही सिबसागर सीटवरुन विजय मिळवला.