आधी ऊसतोड कामगारांच्या भाजी भाकरीचा प्रश्न सोडवा
आधी ऊसतोड कामगारांच्या भाजी भाकरीचा प्रश्न सोडवा तर संपात सहभागी होऊ -लक्ष्मण माने

आधी ऊसतोड कामगारांच्या भाजी भाकरीचा प्रश्न सोडवा
तर संपात सहभागी होऊ -लक्ष्मण माने
जागतिक महामारी कोरोणा सर्व लॉकडाऊन च्या काळात सहा महिन्या पासून काम धंदा मजुरी बंद असल्यामुळे व त्यामध्ये ऊसतोड कामगारांचा बंद काही संघटनांनी त्यामुळे बीड सह महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे, त्यांच्या भाजीभाकरीची अगोदर सोय करा आम्ही नंतर ऊसतोड कामगारांच्या संपामध्ये सहभागी होऊ असं पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण माने यांनी सांगितले बीड येथील शासकीय विश्रामगृहावर ठराविक सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद पार पडली यामध्ये ऊसतोड मुकादम व कामगार संघटनेचे स्थापनेचा विषय घेण्यात आला ऊसतोड कामगार सध्या भटक्या विमुक्त जाती व आदिवासी असल्याचे इतर उत्सव संघटनेला त्यांच्याविषयी माहिती नाही कुठल्याही प्रकारची माहिती नसलेल्या नेत्यांनी ऊसतोड कामगार विषयी घोषणेला सुरुवात केली आहे.
त्यामुळे कामगार अडचणी येत आहेत एके काळी वंजारी, मराठा, तसेच काही वरिष्ठ जातीचे ऊस तोडणीचे काम करत होते. मात्र त्याची टक्केवारी एकदम एक ते पाच टक्क्यांच्या आत येऊन पोहोचली आहे. सध्या महाराष्ट्रा मध्ये दहा ते बारा लाख ऊसतोड मजूर काम करतात. त्यामध्ये भटके विमुक्त जातीचे पन्नास टक्के काम करत आहेत ज्या समूहाचे मजूर नाहीत असे नेते पुढारी स्व:तची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आमच्या गरीब कामगारांच्या जीवाशी खेळत आहेत. ऊठसूट कुणीही संप करीत असल्याने एक तर आमच्या गरीब कामगारांना कोरोना मुळे काम नाही उपासमारीची वेळ आली आहे. अशा अनेक प्रश्नावर त्यांनी पत्रकार परिषद नवी चर्चा केली आपल्या प्रथमेश वरील गरीब कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपण सदैव दारातील सांगितले यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख भटके विमुक्त जाती जमाती संघटना शंकर जाधव, कोषाध्यक्ष भटके संघटना महाराष्ट्र राज्य गंगाधर पुरी सहा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांची नांव नोंदणी पुणे या ठिकाणी होणार लवकरच त्याची सुरुवात आम्ही करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जसे श्रमिक कामगारांना कायदा लागू आहे तसाच कायदा ऊसतोड कामगारांसाठी करावा यासाठी आम्ही वेळप्रसंगी महाराष्ट्र शासनाला देखील धारेवर धरणार आहोत, व त्यांची कामगार कायद्याखाली नोंदणी करून घेण्यासाठी आमची भूमिका आग्रही राहील. आम्ही कारखाने बंद पडू देणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.
बीड
प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत
___________
Also see : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्षपदी भिमराव साठे यांची निवड
https://www.theganimikava.com/Bhimrao-Sathe-elected-as-BJP-Scheduled-Caste-Morcha-city-president