५०% अनुदानाचा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणा-या किडरोगांचे नियंत्रण या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. - कृषी सभापती सुशील चुरी

पालघर जिल्हा हा खरिप पिक घेण्यासाठी अग्रेसर असून विविध पिकांवर वातावरणातील बदलांमुळे ब-याच मोठ्याप्रमाणात किडरोग आढळून येतात. याचा परिणाम उत्पन्नांवर विपरित होतो...

५०% अनुदानाचा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणा-या किडरोगांचे नियंत्रण या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. - कृषी सभापती सुशील चुरी
Farmers should take advantage of the 50% subsidy scheme to control pests due to natural calamities. - Agriculture Chairman Sushil Churi

५०% अनुदानाचा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणा-या किडरोगांचे नियंत्रण या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. - कृषी सभापती सुशील चुरी

 

    पालघर जिल्हा हा खरिप पिक घेण्यासाठी अग्रेसर असून विविध पिकांवर वातावरणातील बदलांमुळे ब-याच मोठ्याप्रमाणात किडरोग आढळून येतात. याचा परिणाम उत्पन्नांवर विपरित होतो. शेतक-यांना भात व इतर पिकांवरील किडरोग नियंत्रणाकरिता ५०% अनुदानाने रासायनिक किटकनाशके / बुरशीनाशके खरेदीकरीता अनुदान उपलब्ध करून देणे, एकात्मिक किड व्यवस्थापन करिता जैविक किटकनाशके / बुरशीनाशके, लाईट ट्रॅप, स्टिकी टॅप्स, फेरोमेन ट्रॅप इ. खरेदीकरीता अनुदान उपलब्ध करून देऊन शाश्वत किडरोग नियंत्रण करणे, शेतपिकांतील तणांचे नियंत्रण करणेकामी तणनाशके खरेदीकरीता शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करुन देणे, इ. गोष्टींचा लाभ कृषी जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी सभापती सुशील चुरी यांनी केले आहे.
      जि.प.सदस्य प्रकाश निकम यांनी २९ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये पालघर जिल्ह्यात सध्या भातपिकांवर व अन्य पिकांवर निरनिराळे रोग आले असून जर या रोगांवर वेळीच औषध फवारणी नाही केली. तर भातपिके खराब होऊन शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी असे सभेमध्ये सूचित करण्यात आले. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ही योजना राबविण्यात येत असून किडरोग नियंत्रणासाठी रासायनिक व जैविक किटकनाशके / बुरशीनाशकांची व तणनाशके इ. खरेदी करावयाची असलेबाबत मागणी गटस्तरावरुन प्राप्त झाल्यावर कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके खरेदीकरीता शेतकऱ्यांना अनुदान देणेकामी गटांना आवश्यकता भासल्यास वित्तप्रेषण देण्यात येईल. लाईट ट्रॅप, स्टिकी टॅप्स, फेरोमेन ट्रॅप इत्यांदीचा लाभ एकात्मिक किड व्यवस्थापन करिता ५०% अनुदानाने देणेत येईल. अशी या योजनेची कार्यपध्दती आहे.
       या योजनेत प्रति शेतकरी जास्तीत जास्त रक्कम रुपये दोन हजाराच्या किंमतीची किटकनाशके, बुरशीनाशके, लाईट ट्रॅप, स्टिकी टॅप्स, फेरोमेन ट्रॅप खरेदीवर ५० % म्हणजेच एकुण किंमतीच्या ५०% अनुदान दिले जाईल. रासायनिक व जैविक किटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके इ. खरेदीकरीता शेतकऱ्यांना शासनाकडील दरकरारानुसार अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. पात्र लाभार्थी ठरवणेची जबाबदारी गटस्तरावरील कृषि विस्तार यंत्रणेची राहील. किटकनाशक खरेदीकरीता अनुदान देताना प्रथम येणा-या शेतक-यांना प्रथम प्राधान्य देणेत येईल. सदर योजना सर्वसाधारण व सर्व घटकातील शेतक-यांसाठी आहेत. सदरची योजना डी.बि.टी. तत्वावर राबविण्यात येते. कृ. वि. अ. (कृषि) पंचायत समिती, मोहिम अधिकारी, कृषि विकास अधिकारी योजनेचे मुल्यमापन करतात. अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सूरज जगताप यांनी दिली.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

__________

Also see :  'अंक नाद'  मार्गदर्शक समितीच्या प्रमुख मार्गदर्शक पदी   डॉ रघुनाथ माशेलकर,डॉ अनिल सहस्त्रबुद्धे 

https://www.theganimikava.com/Dr-Raghunath-Mashelkar-and-Dr-Anil-Sahastrabuddhe-are-the-chief-guides-of-the-Ank-Naad-Steering-Committee