अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्या सह शेतमजूर,ऊसतोड कामगार,गोर-गरीब आणि पडझडीत पडलेल्या घरासाठी भरीव मदत करण्यात यावी-किशन तागडे 

  जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत साहेब यांची भेट घेऊन किशन तांगडे यांनी त्यांच्या माध्यमातून सरकारला केली मागणी. ..

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्या सह शेतमजूर,ऊसतोड कामगार,गोर-गरीब आणि पडझडीत पडलेल्या घरासाठी भरीव मदत करण्यात यावी-किशन तागडे 
Farmers in the district affected by heavy rains should be provided with assistance for agricultural labor, sugarcane workers, the extremely poor and the dilapidated houses - Kishan Tagade

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्या सह शेतमजूर,ऊसतोड कामगार,गोर-गरीब आणि पडझडीत पडलेल्या घरासाठी भरीव मदत करण्यात यावी-किशन तागडे 


  जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत साहेब यांची भेट घेऊन किशन तांगडे यांनी त्यांच्या माध्यमातून सरकारला केली मागणी... 

 

महाराष्ट्रासह संपूर्ण बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसा पासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा हाताशी आलेले पीक गेल्या मुळे संपूर्ण पणे खचून गेला आहे,तसेच ग्रामीण भागात गोर-गरीबां च्या घरांची देखील खूप प्रमाणात पडझड झाली असून त्यामुळे शेतीचे आणि पडलेल्या घरांचे मा.जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या यंत्रणेस विनाविलंब तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यास प्रती हेक्टर एक लाख रुपये,(गायरान धारकासह)गोर-गरीबांच्या पडलेल्या घरासाठी दिड लाख रुपये,शेतमजूर,ऊसतोड कामगार आणि हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीबांना प्रती व्यक्ती दहा हजार रुपये घोषित करून ते ताबडतोब त्यांना देण्यात यावेत,अशी मागणी किशन तांगडे यांनी बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत साहेब यांच्या कडे केली आहे.

हा विषय सरकारने गांभीर्याने घेतला नाही तर पप्पुजी कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही किशन तांगडे यांनी दिला.

यावेळी किशन तांगडे यांना संतोष राऊत साहेबांनी मी तुमच्या भावना/मागणी सरकारला कळवितो आणि आमच्या पातळीवर जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करतो असे ठोस आश्र्वासन दिले.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________

Also see : बारवी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या वारसांचा नोकरीचा प्रश्न आमदार किसन कथोरे यांच्यामुळे सुटला... 

https://www.theganimikava.com/MLA-Kisan-Kathore-solved-the-job-problem-of-the-heirs-of-the-farmers-affected-by-the-Barvi-project