खळबळजनक ! वानवडी परिसरात भरदिवसा गोळीबार

वानवडी परिसरात हांडेवाडी रस्त्यावर एका वाळू पुरवठादार तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पावणे एकच्या सुमारास घडली.

खळबळजनक ! वानवडी परिसरात भरदिवसा गोळीबार
Exciting! Firing all day in the Wanwadi area

खळबळजनक ! वानवडी परिसरात भरदिवसा गोळीबार

पुणे पिंपरी : वानवडी परिसरात हांडेवाडी रस्त्यावर एका वाळू पुरवठादार तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पावणे एकच्या सुमारास घडली. यामध्ये तरूण जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तेथे पोहोचले आहेत.

मयूर हांडे (वय ३२, रा. वानवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हांडे हा वाळूचा मागणीनुसार पुरवठा करतो. दुपारी पावणे एकच्या सुमारास तो हांडेवाडी रस्त्याने जात असताना श्रीराम चौकात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी मयूरच्या गालाला चाटून गेली आहे. यात तो जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयाजवळ बिल्डरचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात दुसरी गोळीबाराची घटना घडली.

पिंपरी, पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे 

_________

Also see : पत्रकार संजय (जासंग) बोपेगावकर यांच्या पत्नी स्मृतिषेश रत्नप्रभा बोपेगावकर यांचा भावपूर्ण वातावरणात  पुण्य अनुमोदन कार्यक्रम संपन्न

https://www.theganimikava.com/Smritishesh-Ratnaprabha-Bopegaonkar-wife-of-journalist-Sanjay-Bopegaonkar-He-conducted-a-merit-approval-program-in-an-emotional-atmosphere