कलेच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रस्तुतकर्त्यांची "महा अँकर असोसिएशन" ची स्थापना
29- कलेच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे निवेदक - अँकर यांची “महा अँकर”.असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे.

कलेच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रस्तुतकर्त्यांची "महा अँकर असोसिएशन" ची स्थापना
पुणे (pune) : 29- कलेच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे निवेदक - अँकर यांची “महा अँकर”.असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे. कलेच्या सर्व घटकातील निवेदकांना संघटित करणे, शासनाच्या संस्कृतिक कार्यक्रमात या असोसिएशनच्या सभासदांना प्राधान्य मिळावे यासाठी पाठपुरावा करणे, शासन दरबारी निवेदकांना कसे अधिकृत करता येईल यासाठी प्रयत्नशील राहणे, शासकीय योजनांचा लाभ निवेदकांना मिळवून देणे,या असोसिएशन मधील सभासदांचे अधिकृत ओळखपत्राचे स्मार्ट कार्ड त्यांना देण्यात येईल सोबत एक वर्षाचा अपघाती विमा मोफत दिला जाईल, असोसिएशनच्या अधिकृत पेजवर सभासदांची पूर्ण माहिती (प्रोफाइल) टाकली जाणार आहे. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे आवश्यक आहे. या सभासदांचे जर कोणी निर्माता इव्हेंटवाले लोक पेमेंट बुडवत असेल किंवा टाळत असतील तर असोसिएशनच्या वतीने अधिकृत कायदेशीर कारवाई करण्यात येईल व आपल्याला न्याय दिला जाईल. असोसिएशनच्या कार्डाचा किंवा सभासदत्वाचा परिणाम तुमच्या अभिनय क्षेत्रावर होणार नाही,अभिनेता/मॉडेल म्हणून जे काही करत असतील त्याच्यावर याचा काही परिणाम होणार नाही.हे फक्त अँकर म्हणून काम करतांना कोणती अडचण येऊ म्हणून आणि आपल्या सुरक्षितते साठीच आहे.अशी माहिती अध्यक्ष योगेश सुपेकर,उपाध्यक्ष संतोष चोरडिया,सचिव जतीन पांडे, कार्यकारिणी सदस्य संदीप पाटील.यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधिक महितीसाठी योगेश सुपेकर मो.9075021152, जतिन पांडे 9822640019.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
_________
Also see : रिपाई राष्ट्रीय सचिव दयाल बहादूरे यांनी घेतली राज्यपालांची भेट...