कोविड रूग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य

रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करानगरसेवक महेश गायकवाड यांची आयुक्ताकडे मागणी

कोविड रूग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य
Empire of unsanitary conditions at Kovid Hospital
कोविड रूग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य

कोविड रूग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य

रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा

नगरसेवक महेश गायकवाड यांची आयुक्ताकडे मागणी

कल्याण (kalyan) : कल्याण मध्ये एका कोविड (covid) हॉस्पिटलचे भयानक वास्तव समोर आले आहे .या रुग्णालयात अस्वछता, इमारतीची दयनीय स्थिती, आणि कोणतीही चांगली सुविधा नसताना हॉस्पिटलकडून लाखो रुपये बिल लावले जात असल्याचा प्रकार शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी समोर आणला असून या हॉस्पिटलवर ठोस कारवाईची मागणी केली आहे.

कल्याण (kalyan) पूर्वेतील आंनद नगर परिसरात साई स्वस्तिक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड (covid) रुग्णावर उपचार करण्यात येतात मात्र या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. जागोजागी पीओपी पडलेले आहे, आयसीयुची सुविधा नाही, एका छोट्या रूममध्ये दोन तीन रुग्णांवर (patient) उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमधून एक डेथ सर्टिफिकेट देण्यात आले या सर्टिफिकेटवर सही असलेल्या डॉक्टरला याबाबत कल्पना नव्हती. हॉस्पिटलच्या हा सर्व भोंगळ कारभार शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड समोर आणत यावर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान याबाबत तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असून कारवाई करण्यात येईल असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली आहे.

कल्याण

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_______

Also see : कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट

https://www.theganimikava.com/kalyan-dombivali-corona-updates-covid-19