शैक्षणिक मिशन, संपूर्ण केंद्राला शिंदे येथे बुक डोनेटसह साहित्य वाटप
शैक्षणिक मिशन, संपूर्ण केंद्राला शिंदे येथे बुक डोनेटसह साहित्य वाटप करण्यात आले...

शैक्षणिक मिशन, संपूर्ण केंद्राला शिंदे येथे बुक डोनेटसह साहित्य वाटप
आज दिनांक 29/9/2020 रोजी जिल्हा परिषद शाळा, शिंदे दिगर ता.सुरगाणा येथे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला कलाटणी मिळेल अशा समाजभिमुख शैक्षणिक मिशन नवोदय व 'डोनेट अ बुक' कार्यक्रमांतर्गत एनडीपीटी चे संचालक मा.श्री.सोमनाथ पवार सर यांच्या तर्फे मोहपाडा केंद्रातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेची तयारी करण्यासाठी नवोदय पुस्तक संच, वही, पेन प्रत्येकी डोनेट करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक शिंदे शाळेचे श्री.पाडवीसर यांनी करत.
केंद्रप्रमुख श्री.जी.एम. चौधरी सर, श्री.सोमनाथ पवार सर व श्री.निवृत्ती महाले सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी शिंदे दिगर येथील भुमिपूत्र श्री.मोतीराम गावित (बाबा), हरणटेकडी ग्रा.पं सरपंच श्री.लक्ष्मण बोरसे दादा, जि.प.शाळा शिंदे दिगर चे शा.व्य.अध्यक्ष श्री.देविदास पवार, मोहपाडा केंद्रप्रमुख,सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
सुरगाणा
प्रतिनिधी - अशोक भोये
_______
Also see : डॉक्टरांनो संकट काळात सतर्क राहून मृत्यूच प्रमाण कमी करा , खा .डॉ . प्रितम ताई मुंडेचे अव्हाण