भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार- पालकमंत्री दादाजी भुसे

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली भूकंपग्रस्त भागाची पाहणी

भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार- पालकमंत्री दादाजी भुसे
Earthquake-resistant houses to be constructed in earthquake-hit areas: Guardian Minister Dadaji Bhuse
भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार- पालकमंत्री दादाजी भुसे
भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार- पालकमंत्री दादाजी भुसे

भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार- पालकमंत्री दादाजी भुसे

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली भूकंपग्रस्त भागाची पाहणी
     
       पालघर (palghar) :  जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील तलासरी धुंदलवाडी या भागात नियमित भूकंपाचे (earthquake) धक्के बसत असून भूकंपग्रस्त भागाला तातडीने मदत  करण्यात येईल  तसेच  भूकंपाच्या (earthquake) तीव्रतेचा परिणाम कमी  करण्यासाठी  तज्ञांची मदत घेऊन त्योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील तसेच भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरे तयार करण्यात येतील असे प्रतिपादन  कृषी,माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी  पालघर जिल्ह्याचा  दौरा  केला . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी या गावात जाऊन पालकमंत्र्यांनी भूकंप ग्रस्त घरांची पाहणी केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  भूकंपग्रस्त भागाचा पाहणी केलेला अहवाल तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे सादर करून तातडीच्या  उपाययोजना तसेच  कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील .तसेच शासनाच्या वतीने भरीव मदत केली जाईल.असेहि  प्रतिपादन श्री भुसे यांनी  केले.

धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर येथे भेट देऊन तेथे दाखल असलेल्या  कोव्हीडच्या (covid) रुग्णांची भेट घेतली. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या भूकंपावर (earthquake) करण्यात येणाऱ्या  उपाययोजना या पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री श्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.  माझे कुटुंब माझी जबाबदारी या  मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या उपक्रमात सर्वांनी आपल्या गावाकडे आपले कुटुंब म्हणून पाहिले पाहिजे,व आपली जबाबदारी समजून  त्याची काळजी घेतली पाहिजे. या योजनेत अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करून सदस्यांची तपासणी करून घ्यायची आहे.ही तपासणी कोव्हीड पुरती मर्यादित न राहता कुठलेही आजाराचे निदान यातून  करता येणार आहे. व त्यातून सुदृढ नागरिक निर्माण करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.असे आवाहन ही यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
  यावेळी जि.प.अध्यक्ष भारती कामडी यांनी भूकंपामागील शास्त्रीय कारण प्रशासनाने शोधून काढले पाहिजे  असे मत व्यक्त केले.तर आ.सुनील भुसारा यांनी भूकंपग्रस्त भागात निवारा स्थळ बनवणे गरजेचे आहे .जुन्या शाळा आहेत त्यांना  धक्का लागल्यास गंभीर परिस्थिती उदभवू शकते अशी शक्यता व्यक्त केली.
 आ.श्रीनिवास वणगा यांनी भविष्यात धक्का लागला तर काय उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.  असे मत व्यक्त केले. 
  यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, मु.का.अ.जि.प.पालघर महेंद्र वारभुवन, प्रांत अधिकारी श्रीमती मित्तल उपस्थित होते.
 

विक्रमगड

प्रतिनिधी-अजय लहारे

______

Also see : वाडा-जव्हार बसचा अपघात, तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी

https://www.theganimikava.com/Three-two-wheelers-drivers-seriously-injured-in-Wada-Jawahar-bus-accident