महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बीड शहरातील काही भागची बत्ती गुल -डॉ.नितीन सोनवणे

दोन दिवसापासून गांधीनगर व परिसरातील लाईट रात्रीच्या वेळी पावसामुळे जात आहे एकदा लाईट गेली की पहाटेपर्यंत येत नाही, त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणच्या या गलथान कारभारामुळे संतापाची लाट आहे.

महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बीड शहरातील काही भागची बत्ती गुल -डॉ.नितीन सोनवणे
Due to the management of MSEDCL's Golthan, the lights of some parts of Beed city went out -Dr. Nitin Sonawane

महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बीड शहरातील काही भागची बत्ती गुल-डॉ.नितीन सोनवणे

बीड :  दोन दिवसापासून गांधीनगर व परिसरातील लाईट रात्रीच्या वेळी पावसामुळे जात आहे एकदा लाईट गेली की पहाटेपर्यंत येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणच्या या गलथान कारभारामुळे संतापाची लाट आहे. या भागात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव होत आहे असे डाॅ.नितीन सोनवणे यांनी सांगितले, महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, हा प्रकार नेहमीच होत असताना कसल्याही उपायोजना केल्या जात नसल्याचे समोर येत आहे बीड शहरातील काही भागात महावितरणच्या गलथान कारभार ग्राहकांना त्रासदायक ठरत आहे. महावितरण पाऊस पडण्यापूर्वी लोंबकळत असलेल्या तारा ताणल्या पाहिजेत वाकलेले खांब सरळ केले पाहिजेत तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्या पाहिजेत यासह इतर कामे केली पाहिजे महावितरणने काही ठिकाणी कामे केली ते थातुरमातुर केले असल्याचा सूर नागरिकांमधून येत आहे. बीड शहरातील गांधीनगर व परिसरातील लाईट गेल्या दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी जात आहे., याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा ही मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. तरी महावितरण या परिसरातील विजेचा सुरळीत वीज पुरवठा नागरिकांना द्यावा असे वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.नितीन सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________

Also see : कुची परिसरात जोरदार पाऊस 

https://www.theganimikava.com/Heavy-rain-in-Kuchi-area