क्रायमिन या साथीच्या रोगा बाबत अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ

 जिल्हयामध्ये गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF) या साथीच्या रोगाची लागण झालेला एकही रुग्ण नाही...

क्रायमिन या साथीच्या रोगा बाबत अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी डॉ. माणिक  गुरसळ
Don't believe the rumors about Crimean epidemic. Manik Gursal

क्रायमिन या साथीच्या रोगा बाबत अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी डॉ. माणिक   गुरसळ

     पालघर :  जिल्हयामध्ये गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF) या साथीच्या रोगाची लागण झालेला एकही रुग्ण नाही. गुजरातमधील सीमे नजिकच्या भागात सुद्धा सदर आजाराने बाधित रुग्ण आढळले नसल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्र्वास ठेवूं नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक   गुरसळ यांनी केले. पशुपालक  व मांस विक्रेत्यांनी घाबरुन जाऊ नये असे ही आवाहन   जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ    यांनी केले.

पशुपालकांमध्ये ,मांस विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते हा  रोग गुजरात मधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता होती म्हणून  पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत या रोगा संबंधी परिपत्रक जारी करण्यात आले  होते. परंतू या रोगाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत जिल्ह्यात नाहीं असे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी सांगितले. सदर विषाणूजन्य रोग एका विशिष्ट प्रकारच्या गोचीडा द्वारे एका जनावरांमधून दुसऱ्या जनावरांना होतो. गोचीड चावल्याने वा बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये दिसून येतो. याकरिता केंद्रीय सर्वेक्षण पथकाने पालघर जिल्ह्यात भेट देऊन पाहणी केली तसेच जिल्ह्यातील आरोग्य व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांचे प्रशिक्षण घेऊन या आजाराबाबत करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व इतर कार्यवाही बाबत मार्गदर्शन केले. या पथकात डॉ प्रा कमलेश उपाध्याय  मेडीकल कॉलेज अहमदाबाद गुजरात , डॉ शंशिकात कुळकर्णी ,नॅशनल सेंटर  नई दिल्ली,डॉ योगेश  गुरव वैज्ञानिक ,  नॅशनल इन्सिटटू पुणे  डॉ  एस एन  शर्मा .कीटकशास्त्रज्ञ, एनसीडीसी. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ प्रशांत ध कांबळे  व अधिकारी वर्ग  उपस्थितीत होते.

सफाळे पालघर

प्रतिनिधी- रविंद्र घरत

____________

Also see :माविमच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात मास्कचे वाटप 

https://www.theganimikava.com/Distribution-of-masks-in-rural-areas-of-Wada-taluka-through-MAVIM