Donate a Device या उपक्रम अंतर्गत पळसन शाळेला टॅब्लेट भेट
जिल्हा परिषद नाशिक ने सुरू केलेल्या 'Donate a device' या उपक्रम अंतर्गत तसेच कोविड 19 च्या काळातही आपल्या मुलांचे शिक्षण अखंडपणे सुरू रहावे...

Donate a Device या उपक्रम अंतर्गत पळसन शाळेला टॅब्लेट भेट
जिल्हा परिषद नाशिक ने सुरू केलेल्या 'Donate a device' या उपक्रम अंतर्गत तसेच कोविड 19 च्या काळातही आपल्या मुलांचे शिक्षण अखंडपणे सुरू रहावे या प्रामाणिक हेतूने पळसन शाळेतील उपमुख्याध्यापक श्री मोहन देवराम धूम यांनी सामाजिक बांधिलकी जपत पळसन शाळेला 12000 रुपये किमतीचा टॅब्लेट भेट दिला. त्यांच्या या कार्याबद्दल सुरगाणा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय संजय कुसाळकर साहेब , अंलगुण बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय धनंजय कोळी साहेब, पळसन केंद्राचे केंद्रप्रमुख हिरे साहेब तसेच धुरापाडा केंद्राचे केंद्रमुख्याध्यापक श्री संजय चव्हाण सर तसेच सर्व पळसन गावातील सर्व पालकांनी कौतुक केले असून अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक श्री. पी. टी.भोये , श्री सी.पी.महाले , श्री.गवळी एस.ए., पाडवी व्ही. के. श्री. गावित जे. एम. श्री. चौधरी व्ही.एन.श्री.जाधव ए. एस.,श्रीमती गायकवाड एस. सी. तसेच ग्रामस्थ- श्री चंदर पाटील, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पळसन, श्री सुरेश गावित व सुभाष सेठ चौधरी उपस्थित होते.
सुरगाणा
प्रतिनिधी - अशोक भोये
_________
Also see : पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवला योगींचा पुतळा....
https://www.theganimikava.com/Pimpri-Chinchwad-Congress-activists-set-fire-to-a-statue-of-Yogi