डॉक्टरांनो संकट काळात सतर्क राहून मृत्यूच प्रमाण कमी करा , खा .डॉ . प्रितम ताई मुंडेचे अव्हाण

SRT रुग्णालय , लोखंडी सावरगाव रुग्णालयात भेट देवून घेतला अढावा....

डॉक्टरांनो संकट काळात सतर्क राहून मृत्यूच प्रमाण कमी करा , खा .डॉ . प्रितम ताई मुंडेचे अव्हाण
Doctors should be vigilant in times of crisis and reduce the death rate: Challenge of Pritam Tai Munde

डॉक्टरांनो संकट काळात सतर्क राहून मृत्यूच प्रमाण कमी करा, खा. डॉ. प्रितम ताई मुंडेचे अव्हाण

  SRT रुग्णालय , लोखंडी सावरगाव रुग्णालयात भेट देवून घेतला अढावा

जिल्ह्याच्या खासदार डॉ.सौ. प्रितमताई मुंडे यांनी आज येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविल रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला वर्तमान काळ हा संकटाचा असून जिल्ह्यात वाढत असलेला मृत्युदर चिंतेचा विषय आहे. हे डॉक्टर परिचारिका रात्रंदिवस परिश्रम करीत असले तरी यापेक्षा अधिक डॉक्टरांनी सतर्क राहण्याची गरज आहे, हे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी बैठकीत बोलताना केले.

संसदेच अधिवेशन संपताच आपल्या मतदार संघात पाय ठेवल्या नंतर लगेच खासदारांनी कोरोना प्रश्नावर लक्ष घातले. त्यांनी येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेवून परस्थीतीचा अढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी सद्द स्थिती खासदारांचा समोर मांडली. यावेळी डॉ. राकेश जाधव, डॉ. बिराजदार, डॉ. नितिन चाटे यांनी चर्चेत सहभाग घेतला. ऑक्सीजन प्लॉंन्ट, जेम्बो सिलेंन्डर यांची माहिती खासदारांनी घेतली. प्रशांत आदनाक यांनी फोन बाबद तक्रार मांडली तेंव्हा बैठकितच तो प्रश्न मार्गी लावला, यावेळी बोलतांना खासदार म्हणाल्या संकटाचा काळ आहे, संसर्ग वाढत आहे, या ठिकाणी सर्व डॉक्टर चांगले काम करत आहेत. तरी वाढता मृत्यू दर कमी करण्यासाठी अरोग्य यंत्रणेनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. डॉक्टरांनी सर्तक राहावे, लोकांचे प्राण वाचवावे अस त्या म्हणाल्या, दरम्यान खासदारांनी लोखंडी सावरगाव येथे असलेल्या कोवीड सेंटरला भेट देवून परस्थितीचा अढावा घेतला. जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सेंटर मध्ये सुरू असलेल्या कामाचा अढावा सादर केला.

   स्वःता खासदार डॉक्टर असल्याने दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. या पाहणी दौऱ्यात भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके

__________

Also see : 'सिंचन भवन' येथे कोरोना विषयक जनजागृती

https://www.theganimikava.com/Awareness-about-Corona-at-Sinchan-Bhavan