गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या:डॉ. स्नेहिल मिश्रा

माझा रुग्ण भाजी विक्रेता आहे. हा मेसेज त्याच्या मुलाने पाठवला आहे. माझ्याकडे शब्द अपुरे पडले, हे खरे हिरो आहेत.असं डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी लिहिलं आहे.

गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या:डॉ. स्नेहिल मिश्रा
mumbai doctor

गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या:डॉ. स्नेहिल मिश्रा

माझा रुग्ण भाजी विक्रेता आहे. हा मेसेज त्याच्या मुलाने पाठवला आहे. माझ्याकडे शब्द अपुरे पडले, हे खरे हिरो आहेत.असं डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी लिहिलं आहे. 

कोव्हिड संसर्गाच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यासारख्या आरोग्य सुविधांची तूट असल्याच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. एकीकडे असहाय्य रुग्णांचे गैरफायदा घेणारे, मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारी प्रवृत्ती दिसते.

तर दुसरीकडे माणुसकीचा वाहणारा झराही दर्शन घडवतोय. मुंबईतील एका प्रसिद्ध डॉक्टरांनाही प्रतिकूल परिस्थितीतील ‘देणाऱ्या हातांचं’ दर्शन घडलं. गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या, या भाजीवाल्याच्या मुलाने पाठवलेल्या मेसेजमुळे डॉक्टरही गदगदले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी झगडावं लागत आहे. यासाठी दात्यांनी पुढे येऊन गरजूंसाठी आर्थिक हातभार लावावा, असं आवाहन वारंवार केलं जातं. अशा प्रसंगात कोणी पैशांची मदत करत आहे, कोणी कोव्हिड हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करुन देत आहे, कोणी घरचा सकस आहार कोरोनाग्रस्त रुग्णांना पुरवत आहे, कोणी कठीण काळात मानसिक पाठिंबा देत आहे, तर कोणी दुःखद प्रसंगात अंत्यसंस्कारासाठी हातभार लावत आहे. कुठल्याही स्वरुपातील मदत छोटी नसते, हे वेळोवेळी अधोरेखित होत आहे.

मुंबईतील खार भागातील हिंदुजा रुग्णालयातील कार्डिओलॉजिस्ट डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी नुकताच ट्विटरवर एक मेसेज शेअर केला. आपल्या भाजीवाल्याच्या मुलाने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉट त्यांनी ट्वीट केला आहे. “माझा रुग्ण भाजी विक्रेता आहे. हा मेसेज त्याच्या मुलाने पाठवला आहे. माझ्याकडे शब्द अपुरे पडले, हे खरे हिरो आहेत” असं मिश्रांनी लिहिलं आहे.

“हाय सर, हॉस्पिटल व्हेंटिलेटर किंवा औषधांचा खर्च भागवू न शकणारे एखादे कोरोनाग्रस्त गरीब कुटुंब आहे का? असल्यास मला कळवा, मला माझा पगार देऊन त्यांचा जीव वाचवायचा आहे” असा भारावणारा मेसेज पाठवला. चेहरा नसलेल्या अशा नायकांचं फारसं कौतुक होत नाही. त्यामुळेच डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी आवर्जून हा मेसेज सोशल मीडियावर शेअर करत इतरांनाही प्रेरणा दिली. हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं असून नेटिझन्सनीही त्याला दाद दिली आहे.

अनेक जणांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकत गरीब कोरोना रुग्णांना मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे.