जिल्ह्याच्या आरोग्याची दुरावस्था, पालकमंत्रीही हरविले, लोकप्रहार संघटनेचे गुरुवारी आंदोलन

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पालघर जिल्ह्यात उभारलेल्या आरोग्य संस्थांमधील दुरावस्था व या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व हरवले असून पालकमंत्री गायब झाले असल्याचा दावा करत

जिल्ह्याच्या आरोग्याची दुरावस्था, पालकमंत्रीही हरविले, लोकप्रहार संघटनेचे गुरुवारी आंदोलन
Districts poor health condition Guardian Minister also lost

जिल्ह्याच्या आरोग्याची दुरावस्था, पालकमंत्रीही हरविले, लोकप्रहार संघटनेचे गुरुवारी आंदोलन

कोरोना (corona) रुग्णांच्या उपचारासाठी पालघर (palghar) जिल्ह्यात उभारलेल्या आरोग्य संस्थांमधील दुरावस्था व या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व हरवले असून पालकमंत्री गायब झाले असल्याचा दावा करत सामाजिक प्रश्नांवर संघटनात्मक कार्य करणाऱ्या लोकप्रहार संघटनेतर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.

लोकहिताच्या प्रश्नाबाबत संघटना बांधील असून ती सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यामुळे जनतेला आरोग्यविषयक भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तरे व संघटक अक्षय म्हात्रे यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या जागतिक महामारीने जगासह, भारत देश, राज्य व पालघर जिल्हा होरपळून निघाला आहे. कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आढळत असून तो वाढतच जात आहे. कोरोनाच्या (corona) महामारीत राज्य व जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेची त्याबाबतच्या नियोजनाची जबाबदारी मोठी ठरते. मागील काही काळापासून पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत अनेक प्रकारच्या त्रुटी निदर्शनास आणून देणारी तसेच त्यांची दुरावस्था झाल्याचा आरोप संघटनेमार्फत केला जात आहे.

पालघर (palghar) ग्रामीण भागातील वाढत जाणारी येथील रुग्ण (patient) संख्या लक्षात घेता या संस्थांमध्ये सेवा देणारे मनुष्यबळ तोकडे आहे. याचबरोबर रुग्णांना उपचारासाठी लागणारा औषधाचा साठाही अल्प असल्याचे दिसते. शासकीय रुग्णालयात औषधांचा होणारा काळाबाजार याने जिल्हा प्रशासनावर प्रश्न निर्माण झाला असून अशा अनेकविध कारणांनी या यंत्रणावर नागरिकांचा विश्वास कमी होत चालला आहे असे संघटनेच्या मोनाली भोईर तरे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदी असलेले, आणि राज्य व जिल्हा प्रशासनात महत्वाचा दुवा असणारे राज्याचे कृषी मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री यांचाही या यंत्रणांवर अंकुश नाही. जिल्ह्यात कोरोनाचा कहर असताना जिल्ह्याचे पालकत्व असलेले हे पालकमंत्री स्वतः इतक्या  महिन्यांपासून गायब असल्याचे दिसून येत आहेत. आरोग्य व्यवस्थेच्या अवस्थेला घेऊन नागरिकांमध्ये चर्चा आहे. जिल्हा प्रशासनही ठप्प आहे, पालकमंत्री हरवले आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हावासीयांच्या या समस्या आंदोलन स्वरूपात शासनाकडे मांडण्यासाठी संघटनेच्या वतीने गुरुवार १० सप्टेंबर रोजी हुतात्म्या स्तंभ, पालघर येथे निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. हे आंदोलन शासनाने नेमून दिलेले नियम पाळून केले जाणार आहे असे संघटनेने म्हटले आहे.

 पालघर

 प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

_______

Also see : कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट

https://www.theganimikava.com/kalyan-dombivali-corona-updates-covid-19