जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था झडपोली यांनी केलेल्या सर्वेक्षणातून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला .

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न
District level Adarsh Shikshak Gunagaurav ceremony held

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

     जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था झडपोली यांनी केलेल्या सर्वेक्षणातून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला .यामध्ये वाडा तालुक्यातून  उर्मिला उमेश खिराडे , पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद शाळा पाली तालुका वाडा यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे, संस्थापक अध्यक्ष ,जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था तथा उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. उर्मिला खिराडे यांनी आतापर्यंत २३ वर्ष सेवा केली असून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत . शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांची मुले गुणवत्ता यादीत आलेली आहेत.पथनाटयातून स्वच्छते विषयी जनजागृती करून उज्जैनी सारखी अतिदुर्गम भागातील ग्राम पंचायत हगंणदारी मुफ्त करण्यास मोलाचे योगदान दिले आहे.मतदान जनजागृती पथनाटयातून केली आहे .

आपले पती उमेश खिराडे  त्यांच्या सहकार्यातून दोन वेळा  आदिवासी बांधवांचा मोफत  विवाह सोहळा  संपन्न केला आहे. त्या दिव्यांग असूनही  उज्जैनी सारख्या अति दुर्गम भागांमध्ये सलग  पाच वर्ष उत्कृष्ट सेवाकरून शाळेचा कायापालट केला .उज्जैनी  या अतिदुर्गम शाळेत काम करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत.त्याची यशोगाथा पालघर च्या वेबसाईटवर आहे . पाली येथे कार्यरत असताना लॉक डाऊन च्या काळातही गल्लीमित्र उपक्रमातून १०० टक्के विदयार्थी शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले आहेत.मुलांसाठी ई लर्निग साहीत्य तयार केले आहे व अध्यापनात त्याचा प्रभावी वापर सुरु आहे. त्यांनी आजपर्यंत ज्या शाळांवर सेवा केली आहे त्या शाळांना  शैक्षणिक उठाव अंतर्गत भरघोस मदत मिळवून दिली आहे. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मधुकर सुक-या शेळका, तालुका विक्रमगड, श्रीमती आश्विनी रविकांत पाघारे, तालुका मोखाडा,  रेखा रामचंद्र दोडे, तालुका जव्हार,  उर्मिला उमेश खिराडे, पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद शाळा पाली तालुका वाडा,  संजीव झेंडू सावकारे तालुका डहाणू, ज्ञानेश्वर फकीरा पाटील तालुका तलासरी, तांविर अहमद तालुका वसई, जागृती चौधरी तालुका पालघर या सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सफाळे ,पालघर 
प्रतिनिधी - रविंद्र घरत

_________

Also see :  जोई श्वानाचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

https://www.theganimikava.com/Joey-celebrated-the-dogs-first-birthday-with-a-bang