पोलीस आणि सफाई कामगारांना स्टीमरचे वितरण

कोरोना काळात पोलीस आणि सफाई कामगार हे सुरवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत...

पोलीस आणि सफाई कामगारांना स्टीमरचे वितरण

कल्याण (Kalyan) : कोरोना काळात पोलीस आणि सफाई कामगार हे सुरवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशा कोरोना योद्ध्यांचे कोरोना पासून रक्षण व्हावे यासाठी शिवसेना पारनाका शाखा आणि स्कायलॅबच्या वतीने वाफ घेण्यासाठी स्टीमर मशीनचे वाटप करण्यात आले.   

कल्याणमधील शिवसेनेचे जेष्ठ नेते, कामगार नेते, माजी स्थायी समिती सभापती, महापालिका प्लानिंग कमिटी चेअरमन, म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनाचे अध्यक्ष हरिश्चंद्र उर्फ बाळ हरदास यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि पारनाका हजेरीशेड याठीकाणी पोलीस, सफाई कामगार आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांना स्टीमर मशीन देण्यात आल्या. बाजारपेठ पोलीस स्टेशन याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र आहिरे यांच्या उपस्थितीत सुमारे ७५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच पारनाका हजेरीशेड येथे रवी गायकवाड यांच्या उपस्थितीत ६० सफाई कामगार आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांना या स्टीमरचे वितरण करण्यात आले.

पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा कर्मचारी हे अहोरात्र काम करत असून यातून अनेक पोलीस, सफाई कर्मचारी कोरोना बाधित देखील झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी  आपले कर्तव्य बजावणाऱ्या या कोरोना योध्याचे सरंक्षण व्हावे यासाठी या स्टीमरचे वितरण केले असल्याची माहिती विभाग प्रमुख दिनेश शेटे यांनी दिली.    यावेळी शिवसेना विभागप्रमुख दिनेश शेटे, स्कायलॅबचे सौरभ पानसरे, सचिन ताम्हणकर, सारंग केळकर, रवी पवार, वैभव चंदने आदीजण उपस्थित होते. दरम्यान यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशचे व.पो.नि. यशवंत चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पोलिसांप्रती दाखवलेल्या आपुलकीबद्दल आभार मानले.

कल्याण, ठाणे 
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

________

Also see : कलेच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रस्तुतकर्त्यांची "महा अँकर असोसिएशन" ची स्थापना

https://www.theganimikava.com/Establishment-of-Maha-Anchor-Association-of-presenters-working-in-various-fields-of-art