माविमच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात मास्कचे वाटप
माविमच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात मास्कचे वाटप करण्यात आले...
माविमच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात मास्कचे वाटप
वाडा : महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्या प्रमाणे माझे कुटुंब माझी जबादारी या मोहिमे अंतर्गत तालुक्यातील कोंढले या गावातील योजनेची माहिती देण्यासाठी व कोरोना या व्हायरस बद्दल जनजागृती करण्यासाठी माविम अध्यक्षा राज्यमंत्री दर्जा ज्योतीताई ठाकरे यांनी माविमच्या माध्यमातून २५०० मास्क वाटप दि. ०२ ऑक्टोबर रोजी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते कोंढले गावात व आदिवासी पाड्यावर घराघरांमध्ये जाऊन वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांना ज्योतीताई ठाकरे यांनी आवाहन केले की आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना कोरोना या आजाराबाबत असलेले गैरसमज व भीती आहे ही जनजागृती करून दूर करायला हवी. यासाठी त्यांनी सर्वांना एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी सांगितले की आपल्या जवळ असलेल्या मोबाईल मधील ' एसएमएस' या शब्दाची माहिती देऊन ते पाळण्याचा आवाहन करा . एस म्हणजे सोशल डिस्टन्स पाला , एम म्हणजे मास्क चा वापर प्रत्येकाने करा आणि एस म्हणजे सॅनिटाइझर चा वापर करण्यासाठी सर्वाना प्रोत्साहित करा. घराघरामंध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती करा तरच आपण या कोरोना या संकटाचा मुकाबला करू शकतो.
तसेच यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.संजय बुरपुलले यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना सांगितले की आमच्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत सर्व नागरिकांनी सहकार्य करायला हवे कारण लोकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत की, आरोग्य खात्यातील कर्मचारी आमच्या घरी येतात आणि आम्हाला जबरदस्तीने गाडीत टाकून घेऊन जातात हा गैरसमज दूर झाला पाहिजे.आम्ही तुमच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी व कोरोना आजारावर वेळेतच प्रतिबंध होण्यासाठी ही तपासणी करतो त्यासाठी सर्वांचा सहकार्य महत्वाचा आहे.
तसेच यावेळी कोंढले गावात संपूर्ण आरोग्य टीम सहित घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून मास्क वाटप केले यावेळी माविम अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ज्योतीताई ठाकरे, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे,पालघर जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, वाडा पंचायत समिती सदस्य राजेश सातवी, अस्मिता लहांगे , वाडा तालुका आरोग्य अधिकारी संजय बुरपुलले ,कोंढले ग्रामपंचायत सरपंच यमुना मुकणे,ग्रामसेवक प्रकाश पाटील व इतर शिवसेना कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
_______
Also see : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कल्याणात युवक काँग्रेसची निदर्शने