मुरबाड पंचायत समिती समाज कल्याण विभागामार्फत  मागासवर्गीय लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप 

 समाजाच्या विकासासाठी मी चोवीस तास कार्यरत आहे -सभापती श्रीकांत धुमाळ 

मुरबाड पंचायत समिती समाज कल्याण विभागामार्फत  मागासवर्गीय लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप 
Distribution of literature to backward class beneficiaries through Murbad Panchayat Samiti Social Welfare Department

मुरबाड पंचायत समिती समाज कल्याण विभागामार्फत  मागासवर्गीय लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप 

घरकुल योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही; आमदार किसन कथोरे    
 
समाजाच्या विकासासाठी मी चोवीस तास कार्यरत आहे -सभापती श्रीकांत धुमाळ 

  मुरबाड पंचायत समितीचे कार्यतत्पर युवा सभापती श्रीकांत धुमाळ यांनी आयोजित केलेल्या मागास वर्गीय 20 टक्के जिल्हा परिषद योजनेअंतर्गत 2019 2020 या या कालावधीमध्ये मागासवर्गीय वस्तीतील लाभार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकताच वाटप करण्यात आले. त्यामध्ये समाज मंदिरासाठी भांडी,मागासवर्गीय लाभार्थ्यांना रोजगारासाठी वाद्यवृंद साहित्य, तबला, मृदुंग ढोलकी, हार्मोनियम, विना इत्यादी साहित्यांचे वाटप तसेच मंडपाचे साहित्य, व्यायाम शाळेचे साहित्य ,वस्तीतील समाज मंदिरांमध्ये अभ्यासिका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी आपल्या मार्गदर्शक भाषणात आमदार किसन कथोरे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तसेच घरकुल योजना पोहोचवण्याचे काम करा एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच शालेय शिक्षणाबाबत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाते. त्यावर शिक्षण विभागाने लक्ष दिले पाहिजे असे आमदार किसन कथोरे यांनी बोलताना सांगितले यावेळी मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी चोवीस तास सामाजिक कार्यासाठी कटीबद्ध आहे व लोकांची कामे झाली पाहिजेत. त्यांच्या अडीअडचणी झाल्या पाहिजेत यासाठी मला कधीही फोन करा किंवा प्रत्यक्ष भेटा असे आवाहन कार्यक्रमावेळी सभापतींनी केले. यावेळी व्यासपीठावर समाज कल्याण सभापती नंदाताई उघडा, ,जि प सदस्य उल्हास बांगर, जिल्हा परिषद सदस्य रेखा ताई कंटे, जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता भावार्थ, जिल्हा परिषद सदस्य किसन गिरा, उपसभापती अरुणाताई खाकर, पंचायत समिती सदस्य दीपक पवार,पंचायत समिती सदस्य प्रगती गायकर, पंचायत समिती सदस्य स्नेहा धनगर,माजी सभापती दत्तू वाघ, माजी उपसभापती सीमा  घरत, पंचायत समिती सदस्य प्रतिभा चौधरी, पंचायत समिती सदस्य जया वाघ, पंचायत समिती सदस्य स्नेहा धनगर तसेच अनिल घरत व इतर मान्यवर आणि लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार व कार्यक्रमाचे आभार विस्तार अधिकारी गजानन  सुरोशे यांनी मांडले.

मुरबाड 

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

__________

Also see : भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्षपदी परेश गुजरे

https://www.theganimikava.com/Paresh-passed-away-as-the-Vice-President-of-BJP-Maharashtra-Pradesh-Yuva-Morcha