पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचे वाटप 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1100 हॅन्डग्लोज व 60 लिटर सॅनिटायझरचे मावळातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात आले....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचे वाटप 
Distribution of handgloves and sanitizers to primary health centers in Mavla on the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचे वाटप 

पिंपरी (pimpri): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा महिला आघाडी मावळ तालुका व पंचायत समिती मावळ यांच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत 1100 हॅन्डग्लोज व 60 लिटर सॅनिटायझरचे मावळातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आढले, येळसे, कार्ला, कामशेत, टाकवे बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पवनानगर ग्रामीण रूग्णालय याठिकाणी सदरचे साहित्य वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश महीला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे , माजी राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष ज्योती जाधव, प्रदेश सदस्य कोमल काळभोर, पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले, भाजपा मावळ महिला आघाडी अध्यक्ष सायली बोत्रे, जिल्हा सरचिटणीस श्रिया रहाळकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, महिला आघाडी कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, सुनिल महाराज वरघडे, माजी सभापती सुवर्णा कुंभार, सरचिटणीस कल्याणी ठाकर, वैशाली ढोरे, स्मिता म्हस्के, अनिता सावले, सीमा आहेर, कल्याणी राक्षे, वैशाली घारे, कल्पना गराडे, रचना विधाटे, प्राची टिळे, मीनाक्षी सोरटे, सुजाता पडवळ, अंजली कडू, गणेश ठाकर, मच्छिंद्र केदारी, अमोल भेगडे, सागर शिंदे, सचिन येवले, सरपंच खंडू कालेकर, उपसरपंच प्रवीण घरदाळे, मंगल टेमगिरे, सुजाता टेमगिरे यांच्यासह डाॅक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी , पुणे 
प्रतिनिधी - आत्माराम काळे 

_______

Also see : सविनय कायदे भंग करत मनसेचा लोकल प्रवास

https://www.theganimikava.com/Local-travel-of-MNS-violating-civil-laws