पंडीत दीनदयाळ यांच्या जयंती सेवासप्ताह निमित्त एलईडी बल्बचे वाटप
पंडीत दीनदयाळ यांच्या जयंती सेवासप्ताह निमित्त एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले...

पंडीत दीनदयाळ यांच्या जयंती सेवासप्ताह निमित्त एलईडी बल्बचे वाटप
पिंपरी चिंचवड : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहाचे औचित्याने स्विकृत नगरसदस्य बिभीषण चौधरी, आदेश नवले, अनिकेत क्षीरसागर यांच्यावतीने आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग १६ व १७ मध्ये एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले.
बिभीषण चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात काल आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग १६ व १७ मध्ये सनलाईट कंपनीचे एलईडी बल्बचे सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले.
मेक इन इंडीयाच्या पार्श्वभुमीवर व्होकल ते लोकल असा आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आपल्या जवळच्या नव उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे.
आमदार लक्ष्मण जगताप व भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १६ व१७ मध्ये प्रभागातील नागरिकांना प्रत्येकी वीज बिलानुसार दोन असे प्रति २० रु. या सवलतीच्या दराने एक हजार पाचशे एलईडी बल्ब पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी, भाजपा शहर सरचिटणीस नगरसेवक मोरेश्वर शेडगे, चिंचवड -किवळे मंडलाचे अध्यक्ष् योगेश चिंचवडे,महिला मोर्चा अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर, सविता पंडीत, प्रदीप पटेल, शिरीष कर्णिक, दिलीप गडदे श्निलेश भोंडवे, धनंजय शाळीग्राम, अनिकेत चितोडकर, समाधान सोनवणे, समाधान भंडारी, प्रकाश आखाडे, मनोज थोरवे, नंदू गोरे, नरेश गोरखा, विलास चव्हाण, रोहीत ओव्हाळ, अमर उत्रेश्वर शिंदे, आदी उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत बिभीषण चौधरी म्हणाले की, ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्ब वापरण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेनुसार बल्बचे वितरण करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळवुन देण्याकरीता हा उपक्रम राबविण्यात आला आहे. देशातील तरुणांना आपला व्यवसाय व्होकल ते लोकल आणि लोकल ते ग्लोबल करण्यासाठी चालना देण्यात येत आहे. आत्मनिर्भर योजनतेतून नवीन उद्योग सुरू होतील. यामुळे बेरोजगार व्यक्तींना काम मिळेल, असेही त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन आदेश नवले यांनी केले.
पिंपरी,पुणे
प्रतिनिधी -आत्माराम काळे
_________
Also see : पिंपरी-चिंचवड अमली पदार्थ विरोधी पथकाकडून २० कोटींचे ड्रग्ज जप्त...