मनोर येथे रोटरी क्लब ऑफ पालघरतर्फे डायलिसिस सेंटर सुरू
रोटरी क्लब ऑफ पालघर व आस्था हॉस्पिटल मनोर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोर येथे रोटरी डायलिसिस सेंटर सुरू झाले.
मनोर येथे रोटरी क्लब ऑफ पालघरतर्फे डायलिसिस सेंटर सुरू
रोटरी क्लब ऑफ पालघर व आस्था हॉस्पिटल मनोर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोर येथे रोटरी डायलिसिस सेंटर सुरू झाले. असून या सेंटरमध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्टन ईलिट, रोटरी ई-क्लब ग्रेटर केप टाउन आणि रोटरी फाउंडेशन यांच्या तर्फे ३ डायलिसीस मशिन रोटरी ग्लोबल ग्रँडअंतर्गत देणगी म्हणून देण्यात आल्या आहेत. तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या स्वाती जजोडिया यांनी पूर्वीच एक मशीन देणगी दिलेली आहे. या मशीनचे वर्च्युअल उद्घाटन आज रोटरी फाऊंडेशनचे ट्रस्टी गुलाम वहानवटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी डिस्टिक गव्हर्नर डॉ. बाल इनामदार व अजय गुप्ता आणि डिस्टिक गव्हर्नर नॉमिनी संदीप अगरवाला हे उपस्थित होते.
गेल्या सहा वर्ष्यानंपूर्वी ढवळे हॉस्पिटलच्या सहकार्याने सुरु केलेल्या पालघर रोटरी डायलिसिस सेन्टरमध्ये आजपर्यंत १२ माशिन असून येथील परिसरातील गरजू लोकांचे सवलतीच्या दारात डायलिसिस केले जाते. परंतु या मशीन अपुऱ्या पडत असून येथे अनेक रुग्ण वेटिंग लिस्टमध्ये आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या करोनावाच्या संकटामध्ये रुग्णांना वसई, मुंबई किंवा वापी येथे जाणे शक्य होत नाही. अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये रोटरी क्लब ऑफ पालघरचे माजी अध्यक्ष अमित पाटील यांनी घेऊन डॉ. अविनाश सोनवणे आणि डॉ. जितेंद्र शिरनामे यांच्या सहकार्याने आस्था हॉस्पिटल मनोर येथे फक्त एक मशीन घेऊन दुसरे रोटरी डायलिसिस सेंटर नऊ एप्रिलला सुरू केले. आत्ता ह्या सेंटरमध्ये एकूण पाच मशीन उपलब्ध झाल्या असून या सेंटरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारकांचा पूर्णपणे मोफत इलाज केला जातो. तर इतर रुग्णांचा सवलतीच्या दरामध्ये इलाज केला जातो. ऐन करोना महामारीच संकट आलेल असताना सेन्टर सुरु करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
____________
Also see : शासकीय आरोग्यसंस्था पालघर जिल्ह्यातील महिलांच्या प्रसूतीसाठी वरदान, कोरोनाच्या टाळेबंदीत २९४६ प्रसूत्या