दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीत बिघाड

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीत बिघाड

दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीत बिघाड
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची तब्येत काल रविवार पासून बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केजरीवाल यांची कोरोनाची चाचणीही होणार आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्यानंतर कालपासून त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी एक दिवस थांबण्यास सांगितलं असल्याने केजरीवाल यांची मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकीकडे दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असल्याने नवं आव्हान निर्माण झालं आहे.