शिरोशी विभागातील विद्युत यंञणेच्या अडचणी सोडवण्यासाठी उपकार्यकारी अभियंता सुराडकर यांची तात्काळ शिरोशी गावाला भेट  

मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या शिरोशी विभागातील गांवामध्ये गणपती सणापासून लाईटचा लंपडाव चालू आहे.

शिरोशी विभागातील विद्युत यंञणेच्या अडचणी सोडवण्यासाठी उपकार्यकारी अभियंता सुराडकर यांची तात्काळ शिरोशी गावाला भेट  
Deputy Executive Engineer Suradkar visits Shiroshi village immediately to solve the problems of electrical equipment in Shiroshi division.
शिरोशी विभागातील विद्युत यंञणेच्या अडचणी सोडवण्यासाठी उपकार्यकारी अभियंता सुराडकर यांची तात्काळ शिरोशी गावाला भेट  

शिरोशी विभागातील विद्युत यंञणेच्या अडचणी सोडवण्यासाठी उपकार्यकारी अभियंता सुराडकर यांची तात्काळ शिरोशी गावाला भेट  

मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या शिरोशी विभागातील गांवामध्ये गणपती सणापासून लाईटचा लंपडाव चालू आहे. गेल्या ४-५ दिवसापासून लाईट गुल असल्यामुळे शिरोशी विभागातील माळ पठार,शिरोशी,शेलगाव,खेड, मांदोशी,वनोटे,शाई,वेळूक,बुरसुंगे, मुरब्याचीवाडी या गावातील नागरिकांचा विद्युत यंञणेबाबतचा प्रचंड उद्रेक व शिरोशी विभागात कार्यरत असलेले शाखा अभियंता श्री.नाहिरे यांच्या कामाबाबतची नाराजी याबाबत कुणबी समाज संघटना मुरबाडचे सरचिटणीस व शेतकरी संघ मुरबाडचे चेअरमन प्रकाश पवार सर व पंचायत समिती मुरबाडचे माजी सदस्य श्री.अनिल घरत यांनी तात्काळ कल्याण(ग्रामीण)विभाग कार्यकारी अभियंता श्री.रामटेके,मुरबाड उपविभाग उपकार्यकारी अभियंता श्री.सुरेश सुराडकर,शिरोशी विभाग शाखा अभियंता श्री.नाहिरे यांच्याशी व्हाटस्प व फोनद्वारे संपर्क केला माञ श्री.रामटेके व श्री.नाहिरे हे नॉटरिचेबल समजले.फक्त श्री.सुराडकर यांना वस्तुस्थिती सांगितली माञ श्री.सुराडकर यांनी तात्काळ निर्णय घेऊन शिरोशी गावाला भेट देऊन विद्युत यंञणेच्या समस्या जाणून घेतल्या.

शिरोशी विभागातील झाडे छाटणी, कर्मचारी मागणी,उमरोली पावर हाऊसवरुन जोडणी करुन शिरोशी विभागात लाईट देणे, शेलगाव,खेड, आळवे अंतर्गत पोल व तारा बदलणे, लाकुडपाडा डी पी बॉक्स बदलणे, वनोटे,शाई चिंचवाडी सावर्णे येथे नवीन ट्रान्फार्मर बसविणे,शाई येथील फॉल्टी मिटर बदलविणे,अब्दुल फार्म हाऊस जवळील पोल बदलणे, शिरोशीगावात नवीन पोल टाकणे, मुरबेचीवाडी नवीन ट्रान्सफार्मर मंजूर असुन काम झाले नाही.इत्यादी समस्या ऐकून घेऊन महिनाभरात त्या सोडविण्याचे आश्वासन देऊन विद्युत बिलांच्या तक्रारी सोडवून बिले भरण्याचे सुराडकर यांनी नागरिकांना आवाहन केले.

यावेळी मुरबाडचे उपकार्यकारी अभियंता श्री.सुराडकर उपस्थित असताना शाखाअभियंता श्री.नाहिरे उपस्थित राहात नाहीत याचा अर्थ कल्याण(ग्रामीण) विभाग कार्यकारी अभियंता श्री.रामटेके हे शिरोशी विभागातील शाखा अभियंता श्री.नाहिरे यांना पाठीशी घालत असल्याचे संशय उपस्थितांनी व्यक्त केला.

या प्रसंगी प्रकाश पवार सर,अनिल घरत,धसई शाखा अभियंता श्री.गटले,मधुकर मुरेकर गुरुजी,शिवसेना नेते विलास देशमुख,संतोष वारघडे,भास्कर घोलप,विशाल देशमुख,नारायण भोईर,संजय शेलवले,बन्टी देसले,जयराम भोईर,उमेश वारघडे,अरुण सपाट,भगवान भला व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

______

Also see : पालघरमध्ये ३२ वर्षीय युवकाची रेल्वे पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या

https://www.theganimikava.com/In-Palghar-a-32-year-old-youth-committed-suicide-by-hanging-himself-under-a-railway-bridge