महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी...

राज ठाकरे यांच्या मुंबई-अलिबाग प्रवासाबाबत दंडात्मक कारवाईची बातमी धादांत खोटी....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी...
Demand of Maharashtra Navnirman Sena

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी...

राज ठाकरे यांच्या मुंबई-अलिबाग प्रवासाबाबत दंडात्मक कारवाईची बातमी धादांत खोटी आहे. परंतु बातमीची कोणतीही खातरजमा न करता चुकीचं आणि खोडसाळ वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल 'झी २४ तास' ने आणि त्यांचीच री ओढणाऱ्या इतर वृत्तमाध्यमांनीही खुलासा प्रसिद्ध करावा.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरला असल्याची बातमी काही वृत्तपत्र आणि चॅनेलने चालवली होती. मात्र, प्रसारीत आणि छापून आलेल्या बातम्या खोट्या असल्याची माहिती राज ठाकरे यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिली आहे. राज ठाकरे म्हणाले ‘बातमी पूर्णपणे खोटी असून असा कोणताही प्रकार घडला नाही’.

छापून आलेली बातमी पूर्णपणे खोटी : राज ठाकरे
प्रसारित आणि छापून आलेल्या बातम्या खोट्या असल्याची माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. राज ठाकरे म्हणाले ‘बातमी पूर्णपणे खोटी आहे, असा कोणताही प्रकार प्रवासादरम्यान घडला नाही’ राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांच्या मार्फत वृत्तपत्र आणि काही चॅनल्सला खुलासा करण्याबाबत पत्रंही लिहीलं आहे..

एका इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीनुसार राज ठाकरे आपले कुटुंब आणि मित्रांसोबत गेल्या शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी सूचना होती. मात्र, राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न घालता उभे होते आणि काही वेळाने त्यांनी सिगारेटही पेटवली. राज ठाकरे हे सिगारेट पित असल्याचे आणि मास्क घातल्याचे बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते राज ठाकरे यांच्याकडे गेले आणि रो रो बोटच्या नियमांविषयी त्यांना सांगितले. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत एक हजार रुपयांचा दंड भरला.

नवी मुंबई

प्रतिनिधी - अनिल भास्करराव काकडे

_______

Also see : भुसावळ येथील यावल रोड येथे नुकत्याच झालेल्या डांबरीकरणाच्या कामाला भावपूर्वक श्रद्धांजली

https://www.theganimikava.com/A-heartfelt-tribute-to-the-recent-asphalting-work-at-Yaval-Road-in-Bhusawal