कल्याणमध्ये भाजपाकडून वीज बिलांची होळी

भरमसाठ वीज बिलांच्या विरोधात कल्याण मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तेजश्री या महावितरणच्या कार्यालयाबाहेर वीज बिलांची होळी करत निदर्शने करण्यात आली

कल्याणमध्ये भाजपाकडून वीजबिलांची होळी

सरसकट वीजबिलं माफ करण्याची मागणी

कल्याण (Kalyan): भरमसाठ वीज बिलांच्या (electricity bill) विरोधात कल्याण मध्ये भारतीय जनता पार्टीच्या (bhartia janta party) वतीने तेजश्री या महावितरणच्या कार्यालयाबाहेर वीज बिलांची (electricity bill) होळी करत निदर्शने करण्यात आली. माजी आमदार तथा भाजपा (bjp) भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेत्तृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

लॉकडाऊन काळात महावितरण (msedcl) कडून नागरिकांना भरमसाठ विज बिले पाठवण्यात आली. ही विज बिले कमी करण्यासाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आली. वारंवार आंदोलने करून देखील सरकार (gov) दाद देत नसल्याने राज्यभरात (state) भाजपकडून मुख्यमंत्र्यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून तसेच इमेल द्वारे पत्र लिहून विज बिलाबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.   

कल्याण पश्चिमेतील तेजश्री या महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार (thackeray  sarkar) विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महावितरणने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलांचा निषेध करण्यात आला. तसेच यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी करण्यासाठी वीजबिलं पेटवली असता पोलिसांनी हि बिलं ताब्यात घेतली. यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज बिल कमी करण्याबाबत निवेदन दिले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत वीज बिल कमी करण्याची मागणी केली.

       नागरिकांच्या समस्या सोडविण्यात ठाकरे सरकार १०० टक्के अपयशी ठरले असून, मुख्यमंत्री रस्त्यावर न उतरता केवळ घरात बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधतात. प्रत्यक्ष जनतेमध्ये गेलं तर जनतेचे काय प्रश्न आहेत हे समजू शकतात. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना भरमसाठ बिलं पाठवली असून हि अन्यायकारक आहेत. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार, उद्योगधंदे बंद आहेत. असे असतांना नागरिक लाईटबिल भरणार कुठून असा सवाल उपस्थित करत यावर उपाय म्हणून सरसकट वीजबिल माफ करण्याची मागणी भाजपातर्फे करण्यात आली असून नागरिकांचे हे वीजबिल पूर्ण माफ केल्याशिवाय भाजपा शांत बसणार नाही असा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.      

       ठाकरे सरकारने कोणतेही रीडिंग न घेता नागरिकांना दुप्पट बिलं पाठवली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिकस्थिती कोलमडलेली असल्याने सरसकट वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले असल्याचे भाजपा शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

कल्याण, ठाणे 
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे  

_____

Also see : पंचायत समिती सुरगाण येथे आदिवासी बचाव अभियान

https://www.theganimikava.com/Tribal-Rescue-Mission-at-Panchayat-Samiti-Surgan