साप व विंचू यांचा वन्य प्राण्यांत समावेश करण्याची महसूल मंञ्यांकडे मागणी !!  

साप व विंचू यांचा वन्य प्राण्यांत समावेश करण्याची महसूल मंञ्यांकडे मागणी केली....

साप व विंचू यांचा वन्य प्राण्यांत समावेश करण्याची महसूल मंञ्यांकडे मागणी !!  
Demand for inclusion of snakes and scorpions in wildlife
साप व विंचू यांचा वन्य प्राण्यांत समावेश करण्याची महसूल मंञ्यांकडे मागणी !!  

साप व विंचू यांचा वन्य प्राण्यांत समावेश करण्याची महसूल मंञ्यांकडे मागणी !!  


वन्यप्राणी हल्ल्यात मनुष्य अथवा पशुधन मृत , अपंग ,जखमी झाल्यास शासन अर्थसहाय्य देते मात्र कोकणातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासह कधी सर्प व विंचू  दंशाने दगावतात त्यामुळे वन्यप्राणी संज्ञेत साप व विंचू यांचा समावेश करण्याची मागणी मुरबाड तालुका शेतकरी  संघाचे चेअरमन  प्रकाश पवार यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

शासन निर्णय महसूल व वनविभाग क्र डब्ल्यू, एल ,पी 0781/प्रं. क्र .267/फ-1 दिनांक 11जुलै 2018 नुसार वाघ , बिबट्या , अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा , तरस, कोल्हा , मगर ,हत्ती, राणकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास 10 लाख रुपये , अपंगत्व आल्यास 5 लाख  रुपये , गंभीर जखमी झाल्यास 1लाख 25 हजार रुपये व किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचाराचा खर्च अर्थसहाय्य म्हणून दिले जाते असा शासन निर्णय आहे.

मात्र कोकणातील शेतकरी खरिपातील भात कापणी साठी शेतात जातात  त्यावेळी प्रचंड उष्णता असते त्यामुळे वन्य प्राण्यां प्रमाणे साप , मण्यार , नाग , फोडसा , विंचू या मुळे ही अनेक शेतकरी दगावतात मात्र यासाठी शासन कुठल्याही प्रकारचे अर्थसहाय्य देत नसल्याने त्या शेतकरी कुटूंबाला मोठ्या संकटातून जावे लागते त्यामुळे साप व विंचू यांचा वन्यप्राणी संज्ञेत समावेश केल्यास कोकणातील शेतकऱ्यांचे सर्प अथवा विंचू दंशाने मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला आर्थिक नुकसानाची झळ पोहचणार नाही म्हणून शासनाने याची त्वरित दखल घेण्याची मागणी मुरबाड तालुका  शेतकरी संघाकडून होत आहे.

मुरबाड

प्रतिनीधी - लक्ष्मण पवार 

_____________

Also see : बीड येथे आज जिवाजी महाले यांची जयंती निमित्त भटक्या विमुक्त जमाती संघटणाचे महाराष्ट्र प्रदेश उपआध्यक्ष खंडू जाधव यांनी केले पुतळ्यास आभिवादन .

https://www.theganimikava.com/Khandu-Jadhav-Maharashtra-State-Vice-President-of-Nomadic-Tribes-Association-saluted-the-statue-on-the-occasion-of-Jivaji-Mahale-birthday-at-Beed-today