महिलेला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी !!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाची व महाराष्ट्र महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन ची सहाय्यक पोलीस आयुक्त व विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची भेट...
शीतल बनसोडे या दलीत रिक्षाचालक महिलेला मारहाण करणाऱ्या दिवा येथील शिवसेनेच्या नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सचिव यांची मागणी!!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाची व महाराष्ट्र महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन ची सहाय्यक पोलीस आयुक्त व विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची भेट
आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे व महाराष्ट्र पत्रकार असोसियशन चे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनीमुंब्रा-कळवा विभागाचे सहाय्यक आयुक्त व विशेष कार्यकारी दंडाधिकारी घोसाळकर यांची भेट घेतली व दिवा येथे झालेल्या दलित रिक्षाचालक शितल बनसोडे या महिलेवर अत्याचार व मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक अमर पाटील व त्याच्या सहकाऱ्यांना तत्काळ ॲट्रॉसिटी गुन्ह्याखाली व विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्याची मागणी केली. तसेच उद्या दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा संबंधित गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. संबंधित सर्व आरोपी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित व त्याच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना संरक्षण देणारे समाजसेवक अमोल केंद्रे यांना सुद्धा संरक्षण देण्यात यावे याची मागणी करणार आहोत. यावेळी महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे महासचिव सिद्धार्थ काळे एडवोकेट संजय शंभरकर ,मिलिंद बेळमकर हे उपस्थित होते.
मुंबई
प्रतिनिधी - संजय बोर्डे
__________
Also see : महिला अत्याचार : महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या ‘दिव्याखाली अंधार’ !