पालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले  इस्कॉनचे टेंडर बंद करण्याची मागणी

टाळेबंदीच्या काळात शालेय पोषण आहारात गडबड....

पालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले  इस्कॉनचे टेंडर बंद करण्याची मागणी
Demand for closure of ongoing ISKCON tenders in Palghar and Wada talukas

पालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले  इस्कॉनचे टेंडर बंद करण्याची मागणी

टाळेबंदीच्या काळात शालेय पोषण आहारात गडबड

शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पालघर व वाडा तालुक्यात मध्यान्ह भोजन देणाऱ्या इस्कॉनचे टेंडर बंद करून ते बचत गटांना देण्यात यावे अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्य अनुश्री पाटील यांनी केली आहे.
     

अनुश्री पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ पातळीवर लेखी केलेल्या तक्रारीमध्ये पालघर जिल्ह्यातील लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार पुर्णपणे बंद आहे. परंतु मार्च व एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार नसतांना शासनाकडून आलेले तांदूळ विद्यार्थ्यांना वाटप होणे अपेक्षित होते. तसा शासनाने २७ मार्च २०२० रोजी आदेश ही काढला होता. मात्र पालघर जिल्ह्यातील पालघर व वाडा तालुक्यामध्ये इस्कॉन (अन्नामृत फाऊंडेशन) मार्फत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन (खिचडी) पुरविली जाते. तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांना स्थानिक बचत गटामार्फत खिचडी पुरविली जाते.

बचत गटांमार्फत मध्यान्न भोजन सुरू असलेल्या तालुक्यातील शाळांना मार्च व एप्रिल बंद काळात बचत गटाने प्रति विद्यार्थी ४ ते ५ किलो तांदूळ, तेल, हळद, मिठ ई. साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केले होते. मात्र इस्काँनने प्रति विद्यार्थी फक्त एक किलो तांदूळ वाटप केले गेले. तेही काही जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना वाटप केले असून माध्यमिक शाळांमध्ये कुठल्या ही प्रकारचे वाटप करण्यात आले नाही. सदर बाब जि.प.सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य अनुश्री पाटील यांनी जि.प. पालघर तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ पातळीवर उघडकीस आणून संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना तांदूळ व इतर साहित्य मिळावे अशी मागणी लावुन धरली होती. याबाबत आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र विद्यार्थ्यांवर कोरोना काळात उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी संबंधित विभागाने वरिष्ठ पातळीवर विद्यार्थ्यांकरिता धान्याची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना सोमवार, दि. १२ रोजी तांदूळ व कडधान्ये मिळाले. त्याबद्दल विद्यार्थी पालक यांच्या कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परंतु माहे मार्च व एप्रिल २०२० मधील धान्य इस्का़ँनने दिले कोणाला ? याबाबत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांवर अन्याय इस्काँनने केला आहे. म्हणून त्यांचे टेंडर प्रशासनाने काढुन घ्यावे आणि इतर तालुक्याप्रमाणे स्थानिक बचत गटांना देऊन विद्यार्थ्यांचा पोषण आहार शिजविण्यासाठी देण्यात यावा. या मागणीकरिता अनुश्री पाटील गावोगावी फिरुन शाळा व्यवस्थापन समिती समवेत बसुन चर्चा करणार आहेत. तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव जि.प. पालघर यांच्याकडे सादर करून फक्त पालघर आणि वाडा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या इस्कॉनचे टेंडर रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

टाळेबंदीच्या काळात इस्कॉनकडे शिल्लक असलेला तांदूळ, डाळ व इतर साहित्य जिल्हा परिषदेच्या शाळांना वाटप करण्यात आला आहे. तसा अहवाल सुद्धा आम्ही पंचायत समितीकडे सादर केला आहे.
        तन्मय घरत, सुपरवायझर, इस्कॉन, पालघर

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

__________

Also see : दै.लोकाशा संपादक व कार्यकारी संपादक विरोधात न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केससहीत मानहानीचा दावा दाखल करणार-डॉ.अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर

https://www.theganimikava.com/Dainik-Lokasha-editor-and-executive-editor-to-file-defamation-suit-in-court-with-both-criminal-and-civil-cases-Dr-Archana-Ganesh-Dhawale-Limbaganeshkar