उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्कारातील आरोपींना शिक्षा व पीडितेला न्याय मिळावा याकरिता शिष्टमंडळाचे नेरुळ पोलिसांना निवेदन
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्कारातील आरोपींना शिक्षा मिळावी व पीडितेला न्याय मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्री. सुलतान मतदार व श्री. राशीद खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नेरुळ पोलिसांना निवेदन दिले...

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्कारातील आरोपींना शिक्षा मिळावी व पीडितेला न्याय मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्री. सुलतान मतदार व श्री. राशीद खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नेरुळ पोलिसांना निवेदन दिले...
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे मनीषा वाल्मिकी नामक मुलीवर झालेल्या सामूहिक आत्याचार व पोलिसांनी सदर मुलीच्या कुटुंबियांना न कळवता केलेला अंत्यसंस्कार या घटनेबद्दल संपुर्ण देशात संतापाची लाट आली आहे,
उत्तरप्रदेश पोलिसांचे भूमिका व मौन संशयास्पद वाटत आहे त्याचबरोबर कायदा व सुववस्थेचे धिंडवडे निघाले असून दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढतच असून केंद्र सरकार याबद्दल बोलायला तयार नाही.
उत्तरप्रदेशात घडलेल्या घटनेतील युवतीला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व आरोपीना कडक शिक्षा व्हावी यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच नविमुंबई अध्यक्ष (अल्पसंख्याक विभाग) श्री. सुलतान मतदार व उपाध्यक्ष श्री. राशीद खान यांच्या वतीने नविमुंबईतील नेरुळ पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले याप्रसंगी समाजसेविका परवीन शाह, रेश्मा कुरेशी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इम्रान शाह, आतिक भाई खान,समाजसेविका ताहीरा सय्यद, सुनीता कट्टीमनी,ज्योती कट्टीमनी,समीर शेख,सुभान खान,गुफ्रान खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नवी मुंबई
प्रतिनिधी - अनिल काकडे
_______
Also see : मुरबाडमध्ये कँडल मार्च काढून मनीषाला भावपूर्ण श्रद्धांजली