आडीवली तलावांच्या सुरक्षा रेलींगचे लोकार्पण

कल्याण पूर्वेतील आडीवली गावातील तलावांच्या भवती सुरक्षेसाठी रेलिंग बसविण्यात आले असून या रेलिंगचे लोकार्पण आज करण्यात आले...

आडीवली तलावांच्या सुरक्षा रेलींगचे लोकार्पण
Dedication of safety railings of Adivali lakes
आडीवली तलावांच्या सुरक्षा रेलींगचे लोकार्पण
आडीवली तलावांच्या सुरक्षा रेलींगचे लोकार्पण

आडीवली तलावांच्या सुरक्षा रेलींगचे लोकार्पण

समाजसेवक राहुल पाटील यांनी स्वखर्चाने बसवले रेलींग

कल्याण : कल्याण पूर्वेतील आडीवली गावातील तलावांच्या भवती सुरक्षेसाठी रेलिंग बसविण्यात आले असून या रेलिंगचे लोकार्पण आज करण्यात आले. आडीवली गावातील युवा समाजसेवक राहुल पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने हि रेलिंग बसवली आहे.

       कल्याण पूर्वेतील आडीवली, ढोकळी, नांदिवली आदी परिसरात झपाट्याने नागरीकरण झाले असून मोठ्या संख्येने याठिकाणी लोकं राहायला आले आहेत. आडीवली गावातील तलावांच्या  आजूबाजूच्या परिसरात अनेक इमारती झाल्या आहे.  पावसाळ्यात या तलावातील पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्त्या कोणता आणि तलाव कोणता हे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. तसेच इतर वेळेला तळ्याच्या भवती कठडे नसल्याने लहान मुलं, नागरिक, वाहनं  या तलावात पडण्याची देखील भीती असते.

नागरिकांची हि समस्या लक्षात घेऊन राहुल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी तलावाच्या भवती सुरक्षेसाठी रेलिंग बसविण्याचे काम सुरु केले होते. हे काम पूर्ण झाले असून आज त्याचे राहुल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी रक्तदान शिबीर आणि जनधन खाते शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील कुटुंबीय, आई एकविरा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________

Also see : मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ मेणबत्ती मार्च शांततेत संपन्न....

https://www.theganimikava.com/Manisha-Valmiki-Murder-and-Atrocities-Candlelight-March-to-Protest-Peaceful-Atrocities-Should-Be-Punished-Amarsingh-Dhaka