पंजाब नॅशनल बँकेच्या ग्रामसंपर्क अभियानाच्या अंतर्गत शाखा मेट येथे कर्ज वितरण मेळावा

पंजाब नॅशनल बँकेने ग्राम संपर्क अभियान सुरू....

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्रामसंपर्क अभियानाच्या अंतर्गत शाखा मेट येथे कर्ज वितरण मेळावा
Debt distribution meet at branch met under Punjab National Bank's Gram Sampark Abhiyan

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्रामसंपर्क अभियानाच्या अंतर्गत शाखा मेट येथे कर्ज वितरण मेळावा

 पंजाब नॅशनल बँकेने ग्राम संपर्क अभियान सुरू केले आहे. या संपर्क अभियानाच्या अंतर्गत कर्ज वितरण मेळावा बँकेच्या आदेशानुसार शाखा मेट येथे दि.०२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी १८ लोकांना कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले.

या मेळाव्यात कृषी तसेच महिला बचत गट, लघुउद्योग यांना कर्ज वितरण करण्यात आले. तसेच बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक योजनांची माहिती देण्यात आली यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, पीक विमा योजना अशा विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन चर्चा करण्यात आली. ऑनलाईन फसवणूक कशी होते व आपण त्यापासून कशी सावधानता बाळगावी याची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाला ठाणे सर्कलचे डेप्युटी सर्कल हेड संतोष रावत, बँकेच्या कृषी विभागाचे सरोज हे बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 वाडा

जयेश घोडविंदे

____