शहापूर तालुक्यात पावसामुळे भात पिकांचे नुकसान
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची बहूजन विकास आघाडीची मागणी...
शहापूर तालुक्यात पावसामुळे भात पिकांचे नुकसान
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची बहूजन विकास आघाडीची मागणी.
शहापूर तालुक्यात आठवडा भर पडत असलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे नुकसान झाले असल्याने शासनाने तात्काळ पिकांच्या नुकसानी चे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी बहूजन विकास आघाडी शहापूर तर्फे करण्यात आली आहे.
तालुक्यात कोरोनोचे संकट अजूनही असून परतीच्या पावसाने तालुक्यातील कापणीसाठी आलेल्या भातशेती सह नागली, वरई, उडीद या पिकांचे हातातोंडाशी आलेले पीक पावसाने व वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना च्या काळात हवालदिल झालेला शेतकरी आता या अस्मानी संकटात सापडला आहे. तालुक्यातील किन्हवली, डोलखांब, शेणवा, साकडबाव, सह सर्वच भागात परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. पिके पाण्यात गेली असून शेतात पाणी साचले आहे. शासकीय यंत्रणेने शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याची गरज असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.दरम्यान परतीच्या पावसामुळे अडचणीत आलेल्या शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेऊन शासकीय मदत मिळवून देण्याची गरज असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
शहापूर
प्रतिनिधी - योगेश हजारे
_________
Also see : माझे कुटूंब, माझी जबाबदारी प्रतिज्ञेचे वाचन करत केडीएमसीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा