दलित/बौद्ध तरुणाला शेतात पाणी पीत असताना ठिबकचा पाईप मोडला म्हणून गुरा-ढोराला प्रमाणे केली जबर मारहाण...

सरकारने आता दिन-दलित/बौद्ध आणि गोर-गरीबांना मारण्याचे अधिकृत लायसनसच अन्याय करणाऱ्याला बहाल करावे, असा उद्दीग्न आणि संतप्त सवाल रिपाईचे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी उपस्थित केला आहे...

दलित/बौद्ध तरुणाला शेतात पाणी पीत असताना ठिबकचा पाईप मोडला म्हणून गुरा-ढोराला प्रमाणे केली जबर मारहाण...
Dalit / Buddhist youth was beaten like a cattle for breaking a drip pipe while drinking water in a field
दलित/बौद्ध तरुणाला शेतात पाणी पीत असताना ठिबकचा पाईप मोडला म्हणून गुरा-ढोराला प्रमाणे केली जबर मारहाण...
दलित/बौद्ध तरुणाला शेतात पाणी पीत असताना ठिबकचा पाईप मोडला म्हणून गुरा-ढोराला प्रमाणे केली जबर मारहाण...

दलित/बौद्ध तरुणाला शेतात पाणी पीत असताना ठिबकचा पाईप मोडला म्हणून गुरा-ढोराला प्रमाणे केली जबर मारहाण...

सरकारने आता दिन-दलित/बौद्ध आणि गोर-गरीबांना मारण्याचे अधिकृत लायसनसच अन्याय करणाऱ्याला बहाल करावे,असा उद्दीग्न आणि संतप्त सवाल रिपाईचे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी उपस्थित केला आहे.
          किशन तांगडे यांनी या प्रकरणी अन्याय ग्रस्त कुठुंबास सोबत घेऊन घेतली बीडचे कर्तव्यदक्ष S P आर.राजा साहेब यांची भेट
  
          निपाणी जवळका,जी,बीड येथील पीडित दलित/बौद्ध युवक संजय बाबुराव बांगर हा आपल्या आई वडिलां सह काम धंद्याच्या निमित्ताने औरंगाबाद येथे वास्तव्य करून राहत आहे.
तीन चार दिवसांपूर्वी आपल्या गावी म्हणजेच निपाणी जवळका येथे तो पीडित तरुण आपली आत्या आणि चुलते
यांना घरी भेटण्यास आला होता,घराला कुलूप लावले असल्यामुळे त्याने आपल्या आत्याला फोन करून विचारले,तर आत्याने मी शेतात कापूस वेचत आहे तू शेतातच माझ्याकडे ये म्हणून सांगितले असता तो पीडित तरुण शेतात जाण्यासाठी निघाला असता त्याला खूप तहान लागली असल्याने तो जवळच शेतात कापूसाला पाणी चालू असल्या कारणाने तो तेथे "पाणी"चालू असल्या मुळे पाणी पिण्यासाठी थांबला असता,अनवधानाने पाणी पीत असताना त्याच्या कडून ठिबक केलेला पाईप तुटला,एवढ्यात आरोपीने ते बघितले आणि त्याला तो नवीन असल्यामुळे नाव विचारले पीडित तरुणाने "बांगर" हे आडनाव सांगताच त्याला तू तर इथलाच"महाराचा"म्हणून शिवीगाळ करून जनावराला मारण्यासाठी असणाऱ्या असुडाने त्याला एखाद्या गुरा-ढोरा प्रमाणे जबर मारहाण करून त्याचे डोके देखील फोडले.

आपण पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून मिरवतो आणि येथे आज हि क्षुल्लक कारणावरून दलित/बौद्ध यांना मारहाण होत असेल तर यापेक्षा आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट कुठली नाही.

किशन तांगडे यांची तब्येत ठिक नव्हती आणि डॉक्टरने त्यांना घरीच आराम करण्याचे सांगितले होते तरी ते पीडितांच्या असहाय वेदना सहन न झाल्याने त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना धीर दिला.

या प्रकरणी बीड चे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक आर.राजा साहेब यांची किशन तांगडे यांनी भेट घेऊन पीडिताला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.यावेळी अत्याचार ग्रस्त तरुणांसह त्याचे कुटूंब सोबत होते.

सातत्याने जिल्हा सह महाराष्ट्रात दलितांवर होणारे हल्ले यापुढे देखील थांबले नाहीत तर रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाईचे तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी दिला आहे.

बीड

प्रतिनिधी -  विश्वनाथ शरणागत

_____________

Also see : ‘माझा रस्ता, माझी जवाबदारी’ उपक्रम राबविण्याची मनविसेची मागणी

https://www.theganimikava.com/My-way-is-my-responsibility-to-carry-out-my-responsibility-activities