दै.लोकाशा संपादक व कार्यकारी संपादक विरोधात न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केससहीत मानहानीचा दावा दाखल करणार-डॉ.अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर

मी अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर, लिंबागणेश येथे १५ वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत असून मला १६ वर्षाची मुलगी व १३ वर्षाचा मुलगा आहे....

दै.लोकाशा संपादक व कार्यकारी संपादक विरोधात न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केससहीत मानहानीचा दावा दाखल करणार-डॉ.अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर
Dainik Lokasha editor and executive editor to file defamation suit in court with both criminal and civil cases: Dr. Archana Ganesh Dhawale Limbaganeshkar

दै.लोकाशा संपादक व कार्यकारी संपादक विरोधात न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केससहीत मानहानीचा दावा दाखल करणार-डॉ.अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर

दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब आणि कार्यकारी संपादक भागवत तावरे यांनी संगनमताने हेतुपूर्वक वैद्यकीय व्यवसाय बदनाम करण्याच्या हेतूने षडयंत्र रचत गंभीर आरोप केल्यामुळे मला, माझ्या पतीला व दोन मुले यांना मानसिक त्रास झाल्यामुळे नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून न्यायालयात या प्रकरणी क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही प्रकारचे गुन्हे दाखल करुन मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे, जेणेकरून पत्रकारितेच्या नावाखाली कोणताही गुन्हा नसताना गंभीर आरोप करत  आरोग्य सेवा देणा-या महिलेला व तिच्या कुटुंबाला मानसिक यातना देणा-या संबधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

मी अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर, लिंबागणेश येथे १५ वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत असून मला १६ वर्षाची मुलगी व १३ वर्षाचा मुलगा आहे. माझे पती सामाजिक काम करत असताना विविध गावातील लोक त्यांच्याकडे प्रशासनाने दखल न घेतलेली प्रकरणे आणतात. त्यातील पुरावे पाहुन ते लोकशाही मार्गाने जिल्हा प्रशासनाला निवेदन, आंदोलन आदी मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ज्यांचे राजकीय अथवा आर्थिक नुकसान होते ती व्यक्ती बदनामी करण्यासाठी खोट्या तक्रारी करत राहतात. यात नविन काही नाही अशाचप्रकारे बेलवाडी ग्रामपंचायत मधिल मयत, शाळकरी मुले, दुबार मतदान, बाहेर गावातील व्यक्तीनी केलेले बोगस मतदान, तसेच मनरेगा अंतर्गत बांधबंदिस्ती प्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी तक्रार केल्यामुळे नरेगा गटविकास आधिकारी यांनी गटविकास आधिकारी पंचायत समिती बीड यांना चौकशी आदेश दिले आहेत. या गोष्टीचा राग मनात धरून दि, १३ ऑक्टोबर रोजी" महिला सरपंच असलेल्या गावांचा डॉ. ढवळेंना पोटशूळ" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. वास्तविक त्यांच्यावर मयत, शाळकरी मुले, बाहेरील गावातील लोक अशा लोकांकडून बोगस मतदान केल्याप्रकरणी सरपंच, सरपंच पतीसह ५१ जणांवर दि, २०/१०/२०१८ रोजी बीड न्यायालयात फौ, अ, क, ७३२/२०१८, कलम ४१६,४६५,४६८,४७३ सह १०९ भादवि प्रमाणे कलम १७,१८,३१ लोक प्रतिनिधित्व कायदा ( Reprasantation of the people act 1950) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजेच भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे. हे सिद्ध होते, त्यांच्या कार्यकर्ता अविनाश पाटोळे नामक व्यक्तीने खोटी तक्रार दिलेली आहे. 

संपादक विजयराज बंब आणि कार्यकारी संपादक भागवत तावरे यांनी केलेला गुन्हा

 दि. १४ ऑक्टोबर रोजी दै लोकाशा मध्ये " डॉ.ढवळेंच्या कुकर्माची चौकशी करा-अविनाश पाटोळे " या पान क्र ८ वर रंगीत पानावर लिंबागणेश येथील दिपक नावाच्या रूग्णालयात डॉ, गणेश ढवळे व त्यांच्या पत्नीकडून१) रूग्णांना दाखल करून घेणे २) गर्भपात करणे ३) डिलिव्हरी करणे असे काम केले जाते म्हणत गंभीर आरोप केले आहेत.

सर्वात प्रथम आमचे डे केअर सेंटर आहे, रूग्णांना दाखल करण्यात येत नाही. दुसरे म्हणजे दिपक क्लिनिक आहे नर्सिंग होम नाही. त्यामुळे डिलिव्हरी केल्या जात नाहीत, तिसरी आणि सर्वात गंभीर आरोप म्हणजे गर्भपात करणे, कुकर्माची चौकशी हा अत्यंत गंभीर आरोप आहे. याविषयी दि, ८ सप्टेंबर रोजी माझ्या पतीने आरोग्य विभागातील अनागोंदी कारभार उघडकीस आणल्यामुळे सूडबुद्धीने केलेल्या कारवाईत सुद्धा गर्भपात करणे वगैरे कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह औषध अथवा साहित्य आढळून आले नाही. तरी सुद्धा केवळ मानसिक दबाव आणण्यासाठी दैनिकात बदनामी केली. याविषयी पुरावे नसताना सुद्धा दै. लोकाशाने बदनामीकारक मजकूर हेड लाईन द्वारे प्रसिद्ध केला. विपरीत डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांच्या वर अवैध गर्भपात प्रकरणात दोन वेळा गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या वरील आरोप उच्च व सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेले आहेत असे ना, धनंजय मुंडे तत्कालीन विरोधी पक्षनेते व आजचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांनी पुराव्यानिशी मुख्य निवडणूक आयुक्त व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना दिलेले असताना याविषयी संपादक विजयराज बंब आणि कार्यकारी संपादक भागवत तावरे मिठाची गुळणी धरून बसतात, त्यांचे लांगुलचालन करत त्यांची ढाल बनन्याचा प्रयत्न करताना संपूर्ण जिल्हा पाहत आहे. 

क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही केसेस न्यायालयात दाखल करून मानहानीचा दावा करणार -डॉ. अर्चना ढवळे लिंबागणेशकर

वारंवार जाणिवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र संपादक विजयराज बंब आणि कार्यकारी संपादक भागवत तावरे यांच्या कडून रचले जाऊन मला व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना हेतुपुरस्कर त्रास देणा-या या महाभागांना त्याच्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येऊन गुन्हा दाखल केला असुन न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केसेस दाखल करण्यात येऊन मानहानीचा दावा करणार आहे.

बीड

प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत

____________

Also see : राज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली...

https://www.theganimikava.com/Minister-of-State-The-meeting-was-held-under-the-chairmanship-of-Honable-Shri-Dattatraya-Bharane-Saheb