उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची बदली.

उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची बदली.

उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची बदली.
DIG-Swati-Sathe-Transfer

उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची बदली.


पुणे- कारागृह उपमहानिरीक्षक ( DIG ) स्वाती साठे यांची राज्याच्या गृह विभागाने तडकाफडकी पुणे येथून नागपुरात बदली केली आहे. एका वर्षाच्या आतच साठे यांची दुसऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे.
कोरणा विषाणू संसर्ग मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पोलिसांच्‍या किमान वर्षभर बदल्या करू नयेत असा आदेश सरकाराने काढला आहे. असे असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची अचानक बदली झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आठ महिन्यापूर्वी स्वाती साठे यांची बदली झाली होती. त्यात पुणे येथील कारागृह मुख्यालयात आस्थापना विभागाच्या उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या . यापूर्वी स्वाती साठे या पश्चिम महाराष्ट्र कारागृह उपमहानिरीक्षक या पदावर होत्या. त्यांनी नाशिक येरवडा ,मुंबईतील आर्थर रोड जेलच्या प्रमुख तसेच नागपूर विभागाच्या कारागृह महानिरीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे.
सोमवारी बदलीचा आदेश
गृह विभागाच्यावतीने स्वाती साठे यांच्या बदलीचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. पूर्व विभागाच्या उपमहानिरीक्षक म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून हे पद रिक्त होते. या पदाच्या अतिरिक्त कार्यभार अमरावती काराग्रह अधीक्षक रमेश कांबळे यांचा कडे होता. स्वाती साठे गेला आठ महिन्यापासून पुणे येथील काराग्रह मुख्यालयात आस्थापना विभागाच्या महानिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. याआधी त्या पश्चिम महाराष्ट्र कारागृह उपमहानिरीक्षक होत्या. विविध ठिकाणी काम करत असताना त्यांनी अनेक योजना राहून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. स्वाती साठे यांनी सोमवारी दुपारी बदलीचा आदेश मिळाल्याचे सांगितले असून बदलीवर कोणताही प्रतिक्रिया दिलेले नाही.