कोरोनाची भीती झुगारून सफाळे तलाठी कार्यालयसमोर आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी
कोरोना विषाणूचा होणारा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये अनेक शाळा महाविद्यालय बंद ठेवून सार्वजनिक कार्यक्रमही रद्द केले आहेत...

कोरोनाची भीती झुगारून सफाळे तलाठी कार्यालयसमोर आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी
कोरोना विषाणूचा होणारा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये अनेक शाळा महाविद्यालय बंद ठेवून सार्वजनिक कार्यक्रमही रद्द केले आहेत. मात्र सफाळे तलाठी कार्यालय समोर आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या गर्दीत आधार कार्ड काढण्यासाठी लहान बालके आणि वयोवृद्ध दिसत होते. आधार कार्ड काढण्यासाठी. खेडोपाड्यातील नागरिक पहाटे साडेसात सुमारात येऊन लाईन उभे राहुन दिवसभर अन्नपाणीविना ताटकळत उभे राहावे लागत असते. या तारखांना काढण्यासाठी दररोज तीसच फॉर्म भरले गेल्याने अनेकांना माघारी जावे लागत आहे.
आधार कार्ड काढण्यासाठी तलाठी कार्यालयावर अनेक चकरा माराव्या लागतात . त्यामुळे खूप मानसिक त्रास होतो गर्दीतील अनेक ग्राहकांनी सांगितले. त्यात काही मोल मजुरी करणारे व भातपिक तयार झाले असुन कापनी सुरू असून वेळ वाया जात आहे . तसेच सफाळे आधार केंद्रावर पंधरा दिवसापासून येणाऱ्या नागरिकांना एखाद्या कोर्टाप्रमाणे तारीख देऊन बोलले जात असल्याचे निदर्शनात आले.
सफाळे, पालघर
प्रतिनिधी - रविंद्र घरत
__________
Also see :नविमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उत्तरप्रदेश मधील मनीषा वाल्मिकी बलात्कार व खूनाबद्दल थाळी नाद आंदोलन.