पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या  पथकाने घेतले ताब्यात...

मोशी येथील काजळे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या  पथकाने घेतले ताब्यात...
Crime Branch team arrested six persons who were preparing to rob a petrol pump

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या  पथकाने घेतले ताब्यात... 

पिंपरी (pimpri) : मोशी येथील काजळे पेट्रोल पंपावर (Petrol pump) दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांचे तीन साथीदार पळून गेले आहेत. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि. 21) रात्री पावणे दहा वाजता केली.

राहुल रमेश चव्हाण (वय 19, रा. कॉलनी नंबर 2, भारतमाता नगर, दिघी पुणे), शेखर संभाजी जाधव (वय 21, रा. मु. पो. मोघा, ता. उदगिर, जि. लातुर), करण गुरुनाथ राठोड (वय 19, रा. लक्ष्मी ज्वेलर्स मागे, दिघी रोड, भोसरी पुणे), कृष्णा संजय तांगतोडे (वय 20, रा. पुणे फिरस्ता, मुळ रा. रोकडे चाळ, मारूती मंदिराजवळ मु.पो. पाथर्डी, ता. जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. तर 17 वर्षीय दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक किरण काटकर व नितीन लोखंडे यांना आरोपी दरोडा टाकणार असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार रात्री पावणेदहा वाजता पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना पकडले तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक सुरा, पाच कोयते, एक मोबाइल फोन, दोन दुचाकी असा एकूण 90 हजार 550 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींनी दुचाकींच्या नंबर प्लेटवर चिखल लावला होता. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी शेखर जाधव याच्यावर उदगीर शहर आणि उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे तीन तर भोसरी पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी कृष्णा तांगतोडे याच्यावर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर, सिन्नर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी करण राठोड याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.

पिंपरी , पुणे 
प्रतिनिधी - आत्माराम काळे

______

Also see : भिवंडी इमारत दुर्घटना; मृत्यू संख्या पोहचली 18 वर...

https://www.theganimikava.com/The-death-toll-in-the-Bhiwandi-building-accident-reached-18