केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं

काही दिवसांपासून कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने देशभरातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं
Covid19 vaccination news

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं

The Union Health Minister finally broke his silence

 काही दिवसांपासून कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने देशभरातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला होता. 

 कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने देशभरातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा नव्या जोमाने कोरोना लसीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे संकेतच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आठ राज्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी या महिन्यातच 8 कोटी व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. तसेच जूनमध्ये 9 कोटी डोस मिळतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीर, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा आणि तेलंगना राज्यांच्या प्रतिनिधींचा या बैठकीत समावेश होता.

कोरोना लसींचा साठा हळूहळू उपलब्ध होईल. ज्यांना पहिला डोस मिळालेला आहे. त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे. या लोकांचं लसीकरण अर्धवट ठेवता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच 30 एप्रिल रोजी राज्यांना येत्या 15 दिवसात व्हॅक्सिन मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार 14 मे रोजी पुढच्या 15 दिवसात किती आणि केव्हा व्हॅक्सीन मिळेल हे सांगण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत 17.52 कोटी लस देण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी 7 वाजेच्या रिपोर्टनुसार 25,47,534 सत्रांसाठी 17,52,35,991 डोस देण्यात आले आहेत. यात 95,82,449 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 65,39,376 कामगारांना दुसरा डोस देण्यात आला.

त्याशिवाय 45 ते 60 वयोगटातील 5,58,83,416 व्यक्तिंना पहिला डोस आणि 78,36,168 लोकांना दुसरा डोस देण्यात आला. तर ज्येष्ठ नागरिकांना 5,39,59,772 पहिला डोस आणि 1,62,88,176 ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 24.4 लाखाहून अधिक लस देण्यात आली. लसीकरणाच्या116 व्या दिवशी 24,46,674 डोस देण्यात आले.

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 48 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 205 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 55 हजार 338 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 197 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 लाख 4 हजार 99 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.