कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर चौथ्या लाटेची भीती

कोरोना विषाणू संसर्गाचा दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या लोकसंख्येच्या शहरांसोबत कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांना देखील सोडलेले नाही.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर चौथ्या लाटेची भीती
Covid 19 latest news

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर चौथ्या लाटेची भीती

कोरोना विषाणू संसर्गाचा दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या लोकसंख्येच्या शहरांसोबत कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांना देखील सोडलेले नाही.

भारतात सध्या दररोज एक लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत तर जवळपास दोन हजार लोकांचा यामुळे मृत्यू होत आहे. दुसरी लाटेमध्ये अधिक रुग्ण आढळत होते त्यावेळी तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट देखील येईल, असा अंदाज वर्तवला होता. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना बाधित करेल असं सांगण्यात आलं होतं.(Fear of the fourth wave after the third wave of the corona)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कसं सुरक्षित ठेवायचं याबद्दल दिल्लीमधील अपोलो रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता मल्होत्रा यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. स्मिता मल्होत्रा म्हणाल्या कोरोनाविषाणू सातत्याने रूप बदलत आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते त्यानंतर चौथी लाट देखील येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

कोरोना महामारी बद्दल राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱ्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. डॉ. स्मिता मल्होत्रा यांनी कोरोना प्रतिबंधक लस हेच आपलं महत्वाचं शस्त्र आहे, असं म्हटलं. देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यास आपण या महामारीला नियंत्रित करू शकतो.

डॉ. स्मिता मल्होत्रा यांनी तिसर्‍या लाटेत लहान मुलं जास्त बाधित होतील, अशी भीती बाळगून राहण्यापेक्षा त्यापासून मुलांना वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तिसऱ्या लाटे विषयी तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार लहान मुलांवर तिसऱ्या लाटेचा परिणाम तितक्या प्रमाणात व्हायचा नाही. सध्याच्या आकडेवारीवर आपण नजर टाकली असता लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी आहे. 

देशातील कोरोनाची दुसरी लाट आता वेगाने ओसरताना दिसत आहे. कारण रविवारी दिवसभरात देशात 1,00,636 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांतील ही निचांकी रुग्णंसख्या आहे. तर दुसरीकडे कोरोना मृतांची संख्याही घटताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात 2427 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाची साथ शिगेला असताना मृतांचा दैनंदिन आकडा हा 4500 पेक्षा जास्त होता.(Fear of the fourth wave after the third wave of the corona)

आता हे प्रमाण तीन हजाराच्याखाली येणे, अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. आतापर्यंत देशातल्या तीन लाख 49 हजार 186 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.