नगरसेवक व नगराध्यक्ष शेंदूर फासलेल्या दगडा सारखेच-संदीप जाधव

बीड शहरातील नागरिक सातत्याने आपल्या प्रभागातील अडीअडचणी रस्ता नाली संदर्भात तसेच बीड शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्या बाबतीत व कचऱ्याच्या ढिगार्‍यामुळे त्रस्त झालेले असून प्रभागातील नगरसेवकांना आपल्या अडचणी सांगून तसेच नगर अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे मागणी केली...

नगरसेवक व नगराध्यक्ष शेंदूर फासलेल्या दगडा सारखेच-संदीप जाधव
Corporator and Mayor Shendur are like broken stones - Sandeep Jadhav

नगरसेवक व नगराध्यक्ष शेंदूर फासलेल्या दगडा सारखेच-संदीप जाधव


बीड शहरातील नागरिक सातत्याने आपल्या प्रभागातील अडीअडचणी रस्ता नाली संदर्भात तसेच बीड शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्या बाबतीत व कचऱ्याच्या ढिगार्‍यामुळे त्रस्त झालेले असून प्रभागातील नगरसेवकांना आपल्या अडचणी सांगून तसेच नगर अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे मागणी करूनही आज तागायत रस्त्याची कचऱ्याच्या ढिगार्‍या पासून रोगराईपासून बीड शहरातील नागरिकांची होणारी हेळसांड थांबलेली नाही.के एस के मार्गे पंचशील नगर ते पालवन चौक कडे जाणारा रस्ता तसेच शास्त्रीनगर ते नाळवंडी नाका पर्यंतचा रस्ता तसेच शहरातील इतर रस्ते हे अतिशय बिकट झालेले असतानाही जलमय-खड्डेमय तसेच नाल्या तुंबलेल्या असता नाही येथील नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या कुचकामी धोरणामुळे बीड शहरातील नागरिकांना अतिशय कसरत करावी लागत आहे. या नागरिकांची अवस्था अतिशय हालाखीची झाली असतानाही लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे बघ्याची भूमिका घेत आहेत.बीड शहरातील नगरसेवक तसेच नगराध्यक्ष यांची दगडाला शेंदूर लावलेल्या सारखेच झालेली आहे. अनेक निवेदने देऊनही नगरसेवक व नगराध्यक्ष यांना सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवणे देखील शक्य होत नाही येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तसेच दोन दिवसाच्या आत बीड शहरातील रस्ते नाली चे कामाला तात्काळ सुरू न केल्यास नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या कुचकामी धोरणाविरुद्ध नगरपालिके समोर आंदोलन करणार असल्याचेही जनप्रहार सामाजिक संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

_____________

Also see : ग्रामिण भागात मोबाईल नेटवर्क टाॅवर उभे करा (उपसभापती)  अरूणा रघुनाथ खाकर यांची तहसीलदार अमोल कदम यांच्या कडे मागणी 

https://www.theganimikava.com/Aruna-Raghunath-Khakar-demand-to-Tehsildar-Amol-Kadam-to-build-mobile-network-towers-in-rural-areas