रिंगरूटमध्ये बाधित होणाऱ्या बांधकामांवर मनपाची निष्कासनाची कारवाई
टिटवाळा परिसरात रिंगरूटचे काम सुरू असुन या रिंगरूट मध्ये काही घरे बाधीत होत आहेत..
रिंगरूटमध्ये बाधित होणाऱ्या बांधकामांवर मनपाची निष्कासनाची कारवाई
कल्याण : टिटवाळ्यातील रिंगरुट रस्त्याच्या कामात बाधीत होणाऱ्या एक बांगला, १ घर तसेच एक धोकादायक इमारत, २ अनाधिकृत रुमवर निष्कासनची कारवाई "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने केल्याने संदर्भीत परिसरातील रिंग रुटच्या कामाला गती मिळणार आहे. तसेच अनाधिकृत रूमवर निष्कासन कारवाईमुळे अनाधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
टिटवाळा परिसरात रिंगरूटचे काम सुरू असुन या रिंगरूट मध्ये काही घरे बाधीत होत आहेत. अशा बाधित घरावर 'अ' प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनुसार निष्कासनची धडक कारवाई करीत रिंग रूट मधील बाधित बांधकामे, अनाधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याचे सत्र सुरु ठेवले आहे.
'अ' प्रभागक्षेत्रातील टिटवाळ्यातील रिंग रूट मध्ये बाधित होणारे पिटर परेरा यांचा बंगला तसेच महागणपती मंदिरामागे १ घर अशी दोन घरे निष्कासीत करीत रिंग रूट मधील अडथळा दूर केला. तसेच टिटवाळ्यातील जयंवत जोशी यांची धोकादायक इमारत निष्कसित करून भुईसपाट करण्यात आली. दोन अनाधिकृत रूमवर हतोडा चालवित जमीनदोस्त करण्यात आल्या.
टिटवाळ्यातील एका अनाधिकृत बांधकाम प्रकरणी एका विकासकावर एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर कोरोना पार्श्वभूमीवर मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांकडुन आतापर्यंत तब्बल सुमारे १ लाख ५० हजार रुपये दंड वसुल केला आहे. रिंगरुट बाधित घरांची निष्कासन कारवाई प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल, ८पोलीस कर्मचारी, अ प्रभागक्षेत्र अनाधिकृत बांधकाम कर्मचारी, १जे सी बी साहय्याने पथकाने केली.
कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
______________
Also see : पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा व तात्काळ मदत जाहीर करावी -ॲड. प्रकाश आंबेडकर