कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा

२८० नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू ४४,०६४ एकूण रुग्ण तर ८५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा
Corona patients cross the 44,000 mark in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा

२८० नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू

४४,०६४ एकूण रुग्ण तर ८५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ४४ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या २८० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या २८० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,०६४ झाली आहे. यामध्ये ३४४४ रुग्ण उपचार घेत असून ३९,७६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २८० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६४, कल्याण प – ६५, डोंबिवली पूर्व ८८, डोंबिवली प- ४८, मांडा टिटवाळा – ९, तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ११ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ५ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी -कुणाल म्हात्रे

____________

Also see : मुरबाडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेना पदनियुक्ती सोहळा संपन्न !

https://www.theganimikava.com/Maharashtra-Navnirman-Vidyarthi-Sena-appointment-ceremony-held-in-Murbad