कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांनी ओलांडला ८०० चा टप्पा

३३८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू ४०,७५० एकूण रुग्ण तर ८०१ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३९६ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांनी ओलांडला ८०० चा टप्पा
Corona deaths in Kalyan Dombivali cross the 800 mark

कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांनी ओलांडला ८०० चा टप्पा

३३८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

४०,७५० एकूण रुग्ण तर ८०१ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ३९६ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण  (kalyan): कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना (corona) मृतांच्या संख्येने ८०० चा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३८८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३३८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४०,७५० झाली आहे. यामध्ये ४६७२ रुग्ण उपचार घेत असून ३५,२७७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८०१ जणांचा कोरोनामुळे (corona) मृत्यू झाला आहे. आजच्या ३३८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ३६, कल्याण प – १०४, डोंबिवली पूर्व ११९, डोंबिवली प- ६७, मांडा टिटवाळा – १०, मोहना -१, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे 
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

________

Also see :पंतप्रधान मोदींचा विराट, मिलिंद, ऋजुतासहीत दिग्गजांशी

https://www.theganimikava.com/Prime-Minister-Modi-with-veterans-including-Virat-Milind-Rujuta