लवकरच 10 हजार डोस उपलब्ध होणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झालेल्या भारताला आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लवकरच 10 हजार डोस उपलब्ध होणार
Corona Vaccine news

लवकरच 10 हजार डोस उपलब्ध होणार

10,000 doses will be available soon

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झालेल्या भारताला आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एकीकडे नव्या रुग्णांची संख्या स्थिर होत असतानाच आता ऑक्सिजनमुळे  जीव गमावणाऱ्या रुग्णांसाठी 2-DG हे नवे औषध उपलब्ध होणार आहे.

हे औषध संरक्षण आणि संशोधन विकास संस्था अर्थात DRDO ने तयार केले आहे. या औषधामुळे कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची फारशी गरज भासणार नाही. पुढच्या आठवड्यात देशभरातील रुग्णालयांमध्ये या औषधाचे तब्बल 10 हजार डोस उपलब्ध होतील.


डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास 2.5 दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आलेय.


डीआरडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.


भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या लाटेमध्ये INMAS-DRDO च्या शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केली. कामामध्ये त्यांना हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्यलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीचं सहकार्य लाभलं. संशोधनात त्यांना 2 डेक्सोय डी ग्लुकोज कोरोना विषाणू विरोधात प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. त्याशिवाय हे औषध विषाणूंची वाढ रोखण्याच कामही करतं.

क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेत मे ते ऑक्टोबर 2020 या काळात हे औषध सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. त्यासोबतचं रुग्ण बरे होण्यामध्ये या औषधाची सकारात्मक परिणामकारकता दिसून आली होती. दुसऱ्या टप्प्यातील काही चाचण्या 6 रुग्णालयांमध्ये घेण्यात आल्या. त्याशिवाय यानंतर रुग्णालयांची सख्या वाढवण्यात आली. देशातील 11 हॉस्पिटलमध्ये 110 रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचं, डीआरडीओनं सांगितले होते.

भारतात सध्या 3 लसी आहेत. भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन राज्य सरकारांना 400 रुपयांना मिळते. सीरम इन्स्टिट्युटची कोव्हिशील्ड राज्य सरकारला 300 रुपयात मिळतेय. स्पुतनिक मात्र 995 रुपयांना मिळणार आहे. रशियाची स्पुतनिक महाग आहे, पण भारतात लसीचं उत्पादन सुरु झाल्यानंतर स्पुतनिक लसीची किंमतही कमी होईल, असं सांगितलं जातंय. जुलैपासून भारतात स्पुतनिकचं उत्पादन होईल अशी घोषणा नीती आयोगानं केलेली आहे. सध्या रशियाहून 1 मे रोजी भारतात दीड लाख स्पुतनिकचे डोस आलेत, अशी माहिती नीती आयोगाच्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलीय.


स्पुतनिक व्ही लस किती प्रभावी आहे, त्यावरही एक नजर टाकुयात. सायन्स जर्नल असलेल्या द लँसेटमध्ये या लसीचे शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पुतनिक व्ही लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी आहे. मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आलीय. या लसीचे ट्रायल होण्याआधीच रशियात या लसीला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे ही लस वादातही सापडली होती. मात्र, आता ही लस अत्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. स्पुतनिक व्ही लसीला एकूण 55 देशांमध्ये मान्यता देण्यात आलीय. स्पुतनिक लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 21 दिवसांनीच दुसरा डोस दिला जातो. 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानातही साठवता येते. त्यामुळं भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते.

देशात लसीचा तुटवडा आहे. त्यात स्पुतनिक लस आल्यानं देशभरातल्या लसीकरण मोहिमेला चांगलाच हातभार लागणार आहे.