कोविशील्डच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचे अंतर आवश्यक

ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांनी सहा महिन्यांनंतर लस घ्यावी, असेही यात म्हटले आहे.

कोविशील्डच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचे अंतर आवश्यक
Corona Vaccine news

कोविशील्डच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचे अंतर आवश्यक

Two doses of Covishield require an interval of 12 to 16 weeks

ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांनी सहा महिन्यांनंतर लस घ्यावी, असेही यात म्हटले आहे.

देशभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट NTAGI कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन अनेक शिफारसी केल्या आहेत. यानुसार कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यापर्यंत वाढवण्याची सूचना दिली आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांनी सहा महिन्यांनंतर लस घ्यावी, असेही यात म्हटले आहे.

NTAGI ने दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिला कोरोना लस घेऊ शकतात. तसेच प्रसूती झालेली किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना लस दिली जाऊ सकते. मात्र जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल, तर तुम्ही सहा महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

एनटीजीआयच्या शिफारसीआधी डॉक्टरांनी कोरोनाची लागण झालेल्यांनी तीन महिन्यानंतर लस घ्यावी असे सांगितले होते. सीडीसी यूएसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोना रिकव्हरी 90 दिवसानंतर लस देण्याची शिफारस केली होती. मात्र त्यात अद्याप कोणतेही बदल केले नाहीत.

त्यासोबत कोविशील्डच्या दोन डोस 12 ते 16 आठवड्यांच्या अंतराने द्यावे, अशी शिफारस केली आहे. सध्या आता कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवडे इतके आहे. मात्र कोवॅक्सिनच्या दोन डोस अंतरामध्ये कोणताही बदल सुचविला जात नाही. एनटीजीआयने शिफारसी आता राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडे पाठवल्या जातील.

दरम्यान, नुकतंच एका अभ्यास केलेल्या दाव्यानुसार, कोरोना लसीचा दुसरा डोस उशिरा दिल्या कोरोना बळींच्या संख्येत वाढ होऊ शकते. तसेच 65 वर्षांपेक्षा कमी असलेल्या लोकांसाठी ही सूचना केली आहे.

2 ते 18 वर्षांच्या मुलांवर करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज 2 आणि फेज 3च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी द्यायला हवी, अशी शिफारस SECने केली होती. भारतात सध्या ज्या दोन व्हॅक्सिनचा उपयोग केला जात आहे. त्या केवळ 18 वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तिसरी लाट येणार असून या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिसऱ्या लाटेवर चिंता व्यक्त केली होती. तिसरी लाट आली तर लहान मुलांचं काय होणार? त्यांच्या कुटुंबीयांचे काय होणार? या मुलांवर कशाप्रकारे उपचार होणार? आदी बाबींवर आतापासूनच विचार करण्याची गरज आहे, असं कोर्टाने केंद्राला म्हटलं होतं.

तिसऱ्या लाटेचा इशारा मिळाल्यानंतर अनेक राज्यांनी लहान मुलांसाठी स्पेशल रुग्णालय आणि कोविड सेंटर्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे.