कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात 10 व्या क्रमांकावर

महाराष्ट्रापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील मृत्यूंची संख्या कितीतरी कमी आहे.

कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात 10 व्या क्रमांकावर
Corona Death news

कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात 10 व्या क्रमांकावर

 महाराष्ट्रापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील मृत्यूंची संख्या कितीतरी कमी आहे. 

सरकारला कोरोना प्रसारामुळे उद्भवलेली स्थिती योग्य तऱ्हेने हाताळता न आल्यानेच महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या 1 लाखापेक्षा अधिक झाली आहे. राज्य सरकारच्या या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात दहाव्या क्रमांकावर गेला आहे, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.(Maharashtra ranks 10th in the world in the number of corona deaths)

राज्य सरकारला कोरोना प्रसार रोखण्यात आलेल्या अपयशावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन करण्याचे नाटक केले. राज्य सरकारने इंधनावरील कर दोनदा वाढविले असताना त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला नाही. काँग्रेसला राज्य सरकारमध्ये किंमतच उरलेली नाही. त्यामुळे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलनाचा फार्स केल्याची टीकाही उपाध्ये यांनी केलीय.

मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे लॉकडाऊन शिथील करण्याबाबत ठाम धोरण नसल्याने राज्यात सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. कोणते निर्बंध उठवले, कोणते निर्बंध कायम आहेत याची स्पष्टता राज्य सरकारकडून होत नसल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासनातील गोंधळाचा फटका सामान्य माणसाला बसत असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यावरुनही केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला हाणलाय. “आम्हालाच परवानगी द्या आम्ही करू. 12 कोटींचे चेक तयार. ग्लोबल टेन्डर काढणार. सात दिवसात लसीकरण पूर्ण करणार. ठाकरे सरकारने नुसत्याच गावगप्पा मारल्या पण ना टेन्डर आल ना १२ कोटीचा चेक दिसला.अजितदादा आणि उद्धवजी यांचे म्हणणे असे आहे की जनतेच्या भल्यासाठी जे जे करायचे असेल ते केंद्रानेच कमी करावे, आम्ही काहीच करणार नाही ;असे चालणार नाही.(Maharashtra ranks 10th in the world in the number of corona deaths)

पेट्रोलचे भाव आटोक्यात आणण्यासाठी इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही त्यावरील कर कमी करावा