पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर

चेतन साकरियाने IPL मधून मिळालेला सगळा पैसा खर्च वडिलांच्या उपचारावर खर्च करण्यायी तयारी दाखवली होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. चेतनला वडिलांना वाचवण्यात अपयश आलंय.

पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर
Corona Death

पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर

Failure to save father, mountain of grief on young cricketer

चेतन साकरियाने IPL मधून मिळालेला सगळा पैसा खर्च वडिलांच्या उपचारावर खर्च करण्यायी तयारी दाखवली होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. चेतनला वडिलांना वाचवण्यात अपयश आलंय.

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया  याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालंय. गुजरातच्या भावनगरमधील एका खाजगी रुग्णायलयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून ते कोरोनाविरुद्धची लढाई लढत होते. मात्र आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांचं निधन झालं.

चेतन साकरियाने आयपीएलमधून मिळालेला सगळा पैसा खर्च वडिलांच्या उपचारावर खर्च करण्यायी तयारी दाखवली होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. चेतनला वडिलांना वाचवण्यात अपयश आलंय. वडिलांच्या जाण्याने चेतनवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

चेतन साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भावनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहिले काही दिवस त्यांनी उपचारांना योग्य प्रतिसाद दिला. मात्र नंतर त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज दुपारी त्यांना कोरोनाने हिरावून नेलंय.

काही दिवसांपूर्वी चेतन साकरियाच्या भावाने आत्महत्या केली. आज वडिलांना कोरोनाने हिरावून नेलं. 22 वर्षीय चेतनवर दुहेरी डोंगर कोसळलाय. भावाच्या निधनानंतर चेतनला जबर धक्का बसला होता. पुढचे काही दिवस चेतनला काहीही सुचत नव्हतं. मात्र महिन्याभरानंतर चेतनने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यंदाच्या सिझनमध्ये चेतनने राजस्थानकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. आयपीएल खेळल्यानंतर कुटुंबाला चांगले दिवस पाहायला मिळतील, अशी आशा असतानाच  आज चेतनच्या वडिलांचा कोरोनाने बळी घेतला.

चेतन साकरियाने आठवड्याभरापूर्वी इंडियन एक्सप्रेसला मुलाखती दिली होती. त्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला होता, “काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून माझ्या वाट्याचे पैसे मिळालेत. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. वडील कोरोनाविरोधी लढाई लढतायेत. अशा मुश्किल परिस्थितीत ते पैसे माझ्या कुटुंबाच्या कामी येतील. जेणेकरुन माझ्या वडिलांवर मी चांगले उपचार करु शकेन.

डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया साधारण कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन आला आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे वडील टेम्पोचालक होते. तर पाच वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या घरात टीव्हीदेखील नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु त्याच्या चुलत्याने त्याला त्यांच्या दुकानात काम करायला सांगितले आणि त्याच्या शिक्षण आणि खेळाचा खर्च उचलला. आता चेतनने आयपीएल खेळून कुटुंबाचं नशीब उजळवलं.

चेतन साकरियाने यंदाच्या साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच त्याने चमकदार कामगिरी केली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 3 फलंदाजांना बाद करुन धडाकेबाज एन्ट्री केली. राजस्थानने खेळलेल्या सहा सामन्यांत त्याने उत्तम गोलंदाजी केली.

राजस्थान रॉयल्सने फेब्रुवारीत झालेल्या लिलावात 1.20 कोटी रुपयांत चेतनला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं होतं.