कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच मृत्यू

समुद्रपूर तालुक्यातील सावंगी येथे रविवारी घरातच आई- मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच मृत्यू
corona update

कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच मृत्यू

Corona positive mother-daughter death at home

समुद्रपूर तालुक्यातील सावंगी  येथे रविवारी घरातच आई- मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे.

समुद्रपूर तालुक्यातील सावंगी  येथे रविवारी घरातच आई- मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे. सुभद्रा डोमाजी मांडवकर  व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे  अशी मृतांची नावे आहेत. मृत आई व मुलगी कुटुंबीयांपासून वेगळ्या राहत असत.

शासकीय रुग्णालयात दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.

कोविड बाबतची दक्षता घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. सुभद्रा आणि सुरेखा या मायलेकींचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नाहीत, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहिले असता दोघांचंही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.

जिल्हयात सध्या कोरोनाबधितांचा आणि मृतकांचा आकडा वाढत आहे. अशातच अनेक रुग्ण तपासणी न करता घरीच राहत आहे. आरोग्य विभागाचे सध्या दुर्लक्ष असल्याने अनेकांचा घरीच मृत्यू होत आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे कोरोनाबळींच्या संख्येत कमालीचा उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे.

राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या 55 ते 70 हजारांच्या दरम्यान स्थिर आहे. कोरोना हा गुणाकार करतो. मात्र, हा गुणाकार थोपवण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आलं आहे. याशिवाय राज्यात कडकडीत लॉकडाऊन असल्याने परिस्थितीत थोडीफार नियंत्रणात येताना दिसत आहे.

 तरीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा आजही नियंत्रणात आलेला नाही. रोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होतोय. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 669 रुग्णांचा मृ्त्यू झालाय. रुग्णांचा मृत्यू आकडा कमी करणं हे सरकार आणि प्रशासनापुढील मोठं आव्हान आहे.

राज्यात काल दिवसभरात तब्बल 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित रुग्ण  आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दररोज वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाख 22 हजार 401 वर पोहोचला आहे.

यापैकी 39 लाख 81 जार 685 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज दिवसभरात 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं जरी असलं तरी बाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे.

महाराष्ट्रात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या एकट्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्के वाढ पाहायला मिळत आहे.

तर नव्याने निदान बाधित होणाऱ्यांची संख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 2 लाख 80 हजार इतकी झाली आहे