पतीला रुग्णालयात दाखल करुन परतली:रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खागा पोलीस हद्दीतील वैसापूर गावात एक बनावट डॉक्टरकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला.

पतीला रुग्णालयात दाखल करुन परतली:रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह
Corona Death

पतीला रुग्णालयात दाखल करुन परतली:रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह

Husband admitted to hospital and returned: Body found on the side of the road

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खागा पोलीस हद्दीतील वैसापूर गावात एक बनावट डॉक्टरकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. 

किशनपूर पोलीस ठाणे हद्दीतील बरेची गावात राहणारे 55 वर्षीय श्रीचंद्र यादव यांना अचानक ताप आला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेले.

दरम्यान रुग्णाची तब्येत बिघडू लागली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णाला शहरातील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात आहे. डॉक्टर रुग्णाला बाइकवर बसून घेऊन गेले आणि गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत सोडून फरार झाले. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या घटनेनंतर पोलीस डॉक्टरचा शोध घेऊ लागले. या प्रकरणात सीओंनी सांगितलं की, किशनपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणारी राणी देवीने प्रभारी निरीक्षकांकडे याबाबत तक्रार दाखल केली. आरोपी डॉक्टरने फतेहपूर येथे उपचारासाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत अवस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून दिलं.

देशात कोरोनानं रौद्र रुप धारण केलं आहे. मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद  होत आहे. शुक्रवारी हा आकडा चार लाखाच्या पार गेला होता. मात्र, आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील चोवीस तासात 3 लाख 8 हजार 522 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. पहिल्यांदाच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण  बरे झाले आहेत.

तर, रुग्णसंख्येतही शुक्रवारच्या तुलनेत घट झाली आहे. या चोवीस तासांमध्ये 3,684 जणांचा मृत्यू झाला आहे.